JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / लग्नानंतर सोशल मीडियावर मुलीचं अकाऊंट पाहून शाहीन आफ्रिदीचे सासरे संतापले

लग्नानंतर सोशल मीडियावर मुलीचं अकाऊंट पाहून शाहीन आफ्रिदीचे सासरे संतापले

शुक्रवारी कराची येथे शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांचा विवाह सोहोळा पारपडला. या सोहोळ्याला पाकिस्तान क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंची हजेरी होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 फेब्रुवारी : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदी शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अंशा हिच्याशी निकाह केला. क्रिकेट विश्वात या लग्नाची बरीच चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वांनी नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र लग्नानंतर शाहीनचे सासरे बुवा शाहिद आफ्रिदी संतापले. शाहीन आणि अंशाचे लग्न झाल्यानंतर ट्विटरवर अंशाचे फेक अकाऊंट ओपन करण्यात आले. मुलीचे हे फेक अकाऊंट पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापला. त्याने सोमवारी सकाळी या ट्विटर अकाउंटचा स्क्रीन शॉट शेअर करत या अकाउंट यूझरला फटकारले. त्याने ट्विट करत लिहिले की, “माझ्या मुली सोशल मीडियावर नाहीत. तेव्हा त्यांच्या नावाने तयार केलेली ही खाती बनावट आहेत आणि त्याची तक्रार केली पाहिजे”.

संबंधित बातम्या

शाहिद आफ्रिदी पूर्वी शाहीन आफ्रिदीने देखील त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे निराशा व्यक्त केली होती. खरंतर शाहीन आणि अंशा यांच्या लग्नात परिवाराने सर्व पाहुण्यांना त्यांचा फोन बंद ठेवण्याची विनंती केली होती. समारंभ स्थळाच्या प्रवेशद्वारावर देखील तशा सुचना लिहिल्या होत्या. मात्र या सुचनेनंतरही शाहीनच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. यावर शाहीनने ट्विट करून निराशा व्यक्त केली होती.

कराची येथे शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांचा विवाह सोहोळा पारपडला. या सोहोळ्याला पाकिस्तान क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंची हजेरी होती. मुस्लिम पद्धतीने या दोघांचा विवाह पारपडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या