सेहवागनं केली भविष्यवाणी
मुंबई, 22 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कप क्रिक्रेट स्पर्धेतल्या सुपर 12 फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. त्यात टीम इंडियाआपली पहिली मॅच 23 ऑक्टोबरला मेलबर्न मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत कोणता बॉलर जास्त विकेट्स घेणार? कोण सर्वात जास्त रन्स करणार? याबाबत क्रिकेट वर्तुळात अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन कोण असेल? याबाबत अंदाज व्यक्त केलाय. वीरेंद्र सेहवाग म्हणाला… सेहवाग म्हणतो… ‘पाकिस्तानचा बाबर आझम सध्या चांगलाच फॉर्मात आहे. विराट कोहलीची बॅटिंग पाहताना जसं आपण एन्जॉय करतो बाबरचीही बॅटिंगही साधारण तशीच आहे. बाबर आझम हा यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधला सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरेल, असा अंदाज सेहवागने व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे सेहवागची भाकितं अनेकदा खरी ठरली आहेत. मध्यंतरी आपल्या क्रिकेट कारकिर्दिविषयी बोलताना ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन डेव्हिड वॉर्नर म्हणाला होता की, ‘सेहवागनं मी टी20 पेक्षा कसोटीत चांगला यशस्वी होईन, असं भाकित केलं होतं.’ आयपीएलमध्ये सेहवागच्या नेतृत्वाखाली खेळताना डेव्हिड वॉर्नरला सेहवागनं तू कसोटीत यशस्वी होशील असं सांगितलं होतं.
हेही वाचा - Ind vs Pak: क्रिकेट चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामन्यात… वर्ल्ड कपमध्ये उद्या महामुकाबला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालची भारतीय टीम उद्या, रविवारी (23 ऑक्टोबर 2022) मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करेल. 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेत दोन्ही टीम आमनेसामने आल्या होत्या. त्या मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. या वेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या टीमला पाकिस्तानविरुद्ध दमदार सुरुवात करण्याची संधी आहे. हेही वाचा - T20 World Cup: कांगारुंवर किवी पडले भारी… 11 वर्षांनी न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियात केली ‘ही’ कामगिरी
या मॅचमध्ये पाकिस्तानसाठी त्यांचा कॅप्टन बाबर आझमची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. आता या स्पर्धेत बाबर सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू असेल, असं मत भारतीय क्रिकेट टीमचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता सेहवागनं केलेली भविष्यवाणी खरी ठरते का हे येत्या काळात कळेलच.