JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : सऊद शकीलच्या विकेटवरून वाद, पंचांच्या चुकीचा पाकिस्तानला फटका?

VIDEO : सऊद शकीलच्या विकेटवरून वाद, पंचांच्या चुकीचा पाकिस्तानला फटका?

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 26 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने मालिका जिंकली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुल्तान, 12 डिसेंबर : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 26 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने मालिका जिंकली. पाकिस्तानचा आघाडीच्या फळीतला फलंदाज सऊद शकीलला दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 94 धावा करता आल्या. मार्क वूडच्या चेंडूवर ओली पोपने त्याचा झेल घेतला. शकील बाद झाल्याने पाकिस्तानला मालिका गमवावी लागली. सऊद शकीलच्या विकेटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रिप्लेमध्ये असं वाटत होतं की, चेंडू ओली पोपच्या ग्लोव्हजमध्ये जाण्याआधी मैदानावर पडला होता. पंचांनी सऊदला बाद दिलं आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांनीही मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. शकील बाद झाल्यानतंर पाकिस्तानचा पूर्ण संघ 328 धावांत बाद झाला. शकील आऊट होता की नव्हता यावरून आता वाद सुरू झाला आहे. हेही वाचा :  WTC Point Table : फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला संधी मिळणार का?

 इंग्लंडचा माजी कर्णधार माइक अथर्टन यांनी कमेंट्रीवेळी म्हटलं की, “तुम्ही यावर वाद घालू शकता की ग्लोव्हज चेंडूवर होता पण चेंडू कदाचित ग्लोव्हजमध्ये नव्हता. चेंडू बहुतेक जमीनीवर पडला असावा.” शकीलची विकेट पाकिस्तानसाठी महागडी ठरली. याशिवाय सऊद शकील त्याचं शतकसुद्धा करू शकला नाही.

संबंधित बातम्या

इंग्लंडने पहिल्या डावात 281 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानला 202 धावाच करता आल्या होत्या. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात 275 धावा केल्या. त्यानतंर विजयासाठी पाकिस्तानला 355 धावांचे आव्हान मिळाले होते. सऊद मैदानात होता तोपर्यंत पाकिस्तान जिंकेल असं वाटत होतं. मात्र तो बाद होताच पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मार्क वूडने 4, ऑली रॉबिन्सनने 2 आणि जेम्स अँडरसनने 2 विकेट घेतल्या. हेही वाचा :  पुजाराला उपकर्णधार केल्यानं वाद; केएल राहुल म्हणाला, ‘निवड कशी करतात माहिती नाही’ पाकिस्तानला 1959 नंतर घरच्या मैदानावर सलग तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. 63 वर्षांनी पाकिस्तानच्या संघावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. इंग्लंडच्या आधी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवलं होतं. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या