मुंबई, 12 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरला सुरू होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकणार नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. तर ऋषभ पंत संघात असताना उपकर्णधार पद चेतेश्वर पुजाराकडे देण्यात आलं आहे. आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पंतला उपकर्णधार का केलं नाही. सामन्याच्या दोन दिवस आधी पत्रकार परिषदेत केएल राहुललासुद्धा याबाबत प्रश्न विचारण्यात आला. भारतीय संघ सध्या पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. संघ निवडीबाबत प्रश्न विचारल्यानतंर केएल राहुल म्हणाला की, किमान मला तरी हे माहिती नाही की कर्णधार किंवा उपकर्णधार निवडण्यासाठी काय निकष आहेत. इतकंच काय तर मला उप कर्णधार केलं होतं तेव्हा आनंद झाला होता पण मला माहिती नाही की हा निर्णय कोण घेतं. हेही वाचा : आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या ऑफरवर संजू सॅमसननं दिलेलं उत्तर वाचून वाटेल अभिमान! केएल राहुलने पुढे सांगितलं की, तुम्हाला एखादी जबाबदारी दिली की आनंद होतो. पण यामुळे फारसा फरक पडत नाही. कारण संघातील प्रत्येक खेळाडुला त्याची भूमिका माहिती होती. सर्व खेळाडुंना माहिती आहे की संघाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. रोहित शर्मा संघाचा कर्णधार आहे. त्याची उणीव भासेल पण आम्ही सध्या आशा करतो तो लवकर तंदुरुस्त होऊन संघात परतेल. हेही वाचा : इंग्लंडने मुल्तान कसोटीसह मालिका जिंकली, पाकिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा काल झाली. कसोटी संघात बीसीसीआयने काही बदल केले आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर असेल. तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा हे दोघे मालिकेत खेळू शकणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.