नीरज चोप्रा
झुरिच-स्वित्झर्लंड, 8 सप्टेंबर**:** ऑलिम्पिक सुवर्णविजेता भारताचा भालाफेकपटून आणखी एका ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये आज अॅथलेटिक्समध्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पार पडणार आहे. या स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात फायनलमध्ये खेळण्याची नीरजची ही तिसरी वेळ आहे. 24 वर्षांचा नीरज 2017 आणि 2018 साली या स्पर्धेच्या फायनलसाठी पात्र ठरला होता. पण त्यावेळी विजेतेपदानं त्याला हुलकावणी दिली होती. लुसानमध्ये जिंकून फायनलसाठी पात्र गेल्या महिन्यात लुसानमध्ये झालेल्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून नीरजनं डायमंड लीगची फायनल गाठली होती. त्या स्पर्धेत नीरजनं 89.08 मीटर भालाफेक केली होती. यंदाच्या वर्षातली ही नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्याच आत्मविश्वासानं आज नीरज झुरिचमध्ये डायमंड ट्रॉफीसाठी फिल्डवर उतरेल. फायनलमध्ये नीरजसमोर पाच जणांचं आव्हान डायमंड लीग भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजसमोर पाच अॅथलीट्सचं आव्हान आहे. त्यात लाटव्हियाचा पॅट्रिक गेल्मस, पोर्तुगालचा रिअँड्रो रॅमोस, अमेरिकेच कर्टिस थॉमसन, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि झेक रिपब्लिकच्या याकूब वालेचचं आव्हान असेल. नीरजची सुवर्ण वाटचाल 2016 साली नीरजनं वयाच्या 18 व्या वर्षी अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर 2018 साली एशियाड सुवर्ण आणि गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक असा नीरजच्या कामगिरीचा आलेख वाढताना दिसला. एशियाडमध्ये भालाफेकीत गोल्ड मेडल मिळवणारा आणि ऑलिम्पिकमध्ये तर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज भारताचा पहिलाच अॅथलीट ठरला होता. नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्समध्येही त्यानं रौप्यपदक पटकावलं होतं आणि आता डायमंड लीगमध्ये तो एक नवा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. हेही वाचा - Asia Cup 2022: आता केवळ प्रतिष्ठेची लढाई, अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडिया ‘या’ चुका टाळणार?
डायमंड लीग फायनल – भालाफेक
वेळ – 8 सप्टेंबर, भारतीय वेळेनुसार रात्री 11.50 वाजल्यापासून ठिकाण – झुरिच, स्वित्झर्लंड थेट प्रक्षेपण – स्पोर्ट्स 18 वर रात्री 8.30 पासून