JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: भारतानंतर झिम्बाब्वेविरुद्धही 'लास्ट ओव्हर ड्रामा', इथेही 'हा' खेळाडू ठरला पाकसाठी व्हिलन

T20 World Cup: भारतानंतर झिम्बाब्वेविरुद्धही 'लास्ट ओव्हर ड्रामा', इथेही 'हा' खेळाडू ठरला पाकसाठी व्हिलन

T20 World Cup: भारत आणि त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धही पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजावं लागलं. हे दोन्ही सामने पाकिस्ताननं गमावले. पण या दोन्ही सामन्यात पाकिस्तानसाठी व्हिलन ठरणारा खेळाडू मात्र एकच होता.

जाहिरात

पाकिस्तानसाठी हा खेळाडू ठरला पुन्हा व्हिलन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पर्थ, 27 ऑक्टोबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. ही धक्कादायक निकालांची मालिका आजही सुरुच राहिली. सुपर 12 फेरीत गुरुवारी तीन सामने पार पडले. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती झिम्बाब्वे आणि पाकिस्तान सामन्याची. या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून सेमी फायनलआधीच गाशा गुंडाळावा लागणार आहे. पण आधी भारत आणि त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धही पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजावं लागलं. हे दोन्ही सामने पाकिस्ताननं गमावले. पण या दोन्ही सामन्यात पाकिस्तानसाठी व्हिलन ठरणारा खेळाडू मात्र एकच होता. मोहम्मद नवाज पर्थमध्येही ठरला व्हिलन भारत-पाकिस्तान संघात मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. शेवटी 3 बॉलमध्ये 13 धावा हव्या असताना नवाजनं वाईड आणि नो बॉलची खैरात केली. ही संधी भारतीय फलंदाजांनी सोडली नाही आणि शेवटच्या बॉलवर भारतानं हा सामना जिंकला.

झिम्बाब्वेविरुद्धही पाकिस्तानला शेवटच्या बॉलपर्यंत झुंज द्यावी लागली. या सामन्यात झिम्बाब्वेनं अवघं 131 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हानही पाकिस्तानला पेलवलं नाही. पाकिस्तानला 129 धावाच करता आल्या. इथे शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 11 धावा हव्या होत्या. तेव्हाही मोहम्मद नवाज स्ट्राईकवर होता. त्यानं पहिल्या बॉलवर 3 धावा काढल्या. दुसऱ्या बॉलवर वसिमनं फोर मारला. त्यामुळे पहिल्या दोन बॉलमध्ये पाकिस्तानी बॅट्समननी 7 धावा वसूल केल्या. पण पुढच्या चार बॉलवर पाकिस्तानला 2 धावाच करता आल्या. 2 बॉलमध्ये 3 धावा हव्या असताना नवाज बाद झाला आणि पाकिस्तानला एका बॉलमध्ये 3 धावा करणं शक्य झालं नाही. हेही वाचा -  Ind vs Ned: गेलनंतर ‘हिटमॅन’चा नंबर, युवीचं रेकॉर्डही ब्रेक; पाहा सिडनीत रोहितनं काय केली कमाल? पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात? पाकिस्ताननं झिम्बाब्वेविरुद्धचा सामना अवघ्या एका धावेनं गमावला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन संघांकडून सलग दोन पराभव स्वीकारल्यामुळे पाकिस्तानचा आता सेमी फायनलचा मार्ग जवळपास बंद झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या