मुंबई, 05 डिसेंबर : आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारतीय संघ ग्रुपमध्ये अव्वल स्थानी होता. मात्र सेमीफायनलमध्ये संघाला इंग्लंडकडून १० विकेटने नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. यामुळे टी२०मध्ये भारतीय संघावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं गेलं. टी२० वर्ल्ड कपनंतर बीसीसीआय़ने अखिल भारतीय वरिष्ठ पुरुष निवड समिती बरखास्त केली होती. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. टी२० वर्ल्ड कप २०२२ नंतर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंड दौऱ्यात टी२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते. लवकरच हार्दिक पांड्याला टी२० संघाचे नेतृत्व कायमस्वरुपी सोपवलं जाईल अशंही म्हटलं जात आहे. तसंच टी२० प्रकारासाठी टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणाही होऊ शकते. हेही वाचा : टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अंडर १९ संघाचे नेतृत्व शेफाली वर्माकडे बीसीसीआय़च्या सूत्रांनी इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, आम्ही याबद्दल खरंच विचार करत आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाच्या क्षमतेबद्दल नाही तर याबद्दल आहे की व्यग्र वेळापत्रकात व्यवस्थापन करणाऱ्या आणि स्पेशलाइज स्किल्स बोर्डवर आणता यावीत. टी२० क्रिकेट आता पूर्ण वेगळा खेळ झाला आहे. टीम इंडिया लवकरच टी२० प्रशिक्षणासाठी नवीन सेटअप तयार करेल. हेही वाचा : दिग्गज फुटबॉलपटू पेलेंना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी? मुलींनी दिली प्रकृतीबद्दल माहिती प्रशिक्षक बदलाच्या हालचाली सुरू झाल्यास राहुल द्रविडची जागा कोण घेणार याची चर्चा रंगली आहे. जानेवारीमध्ये टी२० संघाचा कायमस्वरुपी कर्णधार आणि नवा कोचिंग स्टाफ जाहीर होऊ शकतो. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं तर रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व ठेवलं जाईल.