JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, DC vs LSG : मॅच दरम्यान घडली भयंकर घटना, भर मैदानात कळवळला Prithvi Shaw

IPL 2022, DC vs LSG : मॅच दरम्यान घडली भयंकर घटना, भर मैदानात कळवळला Prithvi Shaw

दिल्लीला पराभव स्विकारावा लागला असला तरी क्रिकेट जगतात चर्चा आहे ती म्हणजे पृथ्वी शॉची(Prithvi Shaw ) असह्य वेदना होत असतानाही त्याने अर्धशतक ठोकले.

जाहिरात

Prithvi Shaw

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 मार्च: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या मॅचमध्ये दिल्लीला पराभव स्विकारावा लागला असला तरी क्रिकेट जगतात चर्चा आहे ती म्हणजे पृथ्वी शॉची(Prithvi Shaw ) असह्य वेदना होत असतानाही त्याने अर्धशतक ठोकले. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बॅटिंग करत असताना मोठी घटना घडली. पृथ्वीच्या प्रायव्हेट पार्टवर बॉल लागला. त्यानंतर पृथ्वी वेदनेने ओरडत जमिनीवर झोपला गेला. लखनऊ सुपर जायंट्सचा अँड्र्यू टाय सामन्यातील सहावी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर चेंडू पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टला लागला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फिजिओला मैदानात यावं लागलं. काही काळ खेळ थांबवण्यात आला. पृथ्वीचे जोरदार अर्धशतक, दिल्लीचे लखनौ सुपरजायंट्सला 150 धावांचे आव्हान त्यामुळे पृथ्वीला गंभीर इजा झालीये का, अशी भिती व्यक्त करण्यात आली. मात्र काही मिनिटांच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरु झाला. यानंतर पृथ्वी आऊट झाला. पृथ्वीने 34 बॉसमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. लखनऊ सुपर जायंट्सची खेळी लखनऊचा संघ 150 धावांच्या लक्षाचा पाठलाग करत मैदानात उतरला. सुरुवातीला लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलने 25 चेंडूत 24 धावांची, तर क्विंटन डी कॉकने 52 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यानंतर एविन लुईस 13 चेंडूत केवळ 5 धावा काढून बाद झाला. दीपक हुड्डाला देखील 13 चेंडूत 11 धावाच करता आल्या. अखेरीस कृणाल पांड्या आणि आयुष बदोनीने सामना लखनऊच्या खिशात टाकला. पांड्याने 14 चेंडूत नाबाद 19 धावा, तर बदोनीने 3 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आतापर्यंत चार पैकी 3 सामने जिंकत दमदार प्रदर्शन केलंय. दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यात दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या