जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पृथ्वीचे जोरदार अर्धशतक, दिल्लीचे लखनौ सुपरजायंट्सला 150 धावांचे आव्हान

पृथ्वीचे जोरदार अर्धशतक, दिल्लीचे लखनौ सुपरजायंट्सला 150 धावांचे आव्हान

पृथ्वीचे जोरदार अर्धशतक, दिल्लीचे लखनौ सुपरजायंट्सला 150 धावांचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात सुरू आहे. यात लखनौ सुपरजायंट्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांचा फायद्याचा राहिल्याचे चित्र आहे. कारण लखनौच्या संघाने दिल्लीला फक्त 149 धावांवर रोखले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात सुरू आहे. यात लखनौ सुपरजायंट्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांचा फायद्याचा राहिल्याचे चित्र आहे. कारण लखनौच्या संघाने दिल्लीला फक्त 149 धावांवर रोखले. यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने दमदार अर्धशतक झळकवले. त्याने 34 चेंडूत 61 धावा ठोकल्या. तर तेच दिल्लीच्या संघातील वरीष्ठ फलंदाज आज अपयशी झाला. तो तब्बल 12 चेंडू खेळला. मात्र, फक्त चार धावा केल्या.

जाहिरात

तर यासोबतच दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंत याने 36 चेंडूंत 39 धावा केल्या. त्याने 3 चौकार तर 2 षटकार लगावले. तसेच सरफराज खान याने 28 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने तीन चौकार लगावले. लखनौकडून रवी बिष्नोई याने 2 तर के. गौथम याने गडी बाद केला. अशाप्रकारे दिल्लीने लखनौला 150 धावांचे आव्हान दिले आहे.

या दोन्ही संघापैकी दिल्ली संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना गमावला आहे. तसेच लखनौ सुपरजायंट्स संघाचे तीन सामने झाले आहेत, त्यापैकी एका सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ ( Delhi Capitals Team ) सध्या गुणतालिकेत चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स चार गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान आहेत.

जाहिरात

टीम सेफर्टच्या जागी आजच्या सामन्यासाठी वॉर्नरचा दिल्ली कॅपिटल्स संघात समावेश केला जाईल. तर स्टॉइनिस लखनौ संघात अँड्र्यू टाय किंवा एविन लुईसची ( Evin Lewis ) जागा घेईल. सध्या तो टायऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता जास्त आहे. दोन्ही संघांची गोलंदाजी चिंतेचे कारण ठरली असली, तरी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली ( Gautam Gambhir ) सुपर जायंट्स संघाने छाप पाडली आहे.

जाहिरात

हेही वाचा -  IPL 2022 : ऋषभ पंतकडून ‘ही’ गोष्ट शिकणार, दिल्लीत दाखल होताच वॉर्नरनं केलं जाहीर

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि एनरिक नॉर्टजे.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधआर), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात