JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / लाथाडलेल्या टीमचा कुलदीप यादवने घेतला बदला, चारी मुंड्या केल्या चीत

लाथाडलेल्या टीमचा कुलदीप यादवने घेतला बदला, चारी मुंड्या केल्या चीत

दिल्लीकडून कुलदीप यादवने(kuldeep yadav) भेदक मारा केला. कुलदीपने कोलकात्याच्या चार महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीपने 4 षटकांत 14 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.

जाहिरात

kuldeep yadav

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल: कुलदीप यादवने (kuldeep yadav) आपल्या डावातील पहिल्याच षटकात दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग विकेट घेतल्या. कुलदीपने दुसऱ्या चेंडूवर बाबा इंद्रजीतला बाद केले, तर तिसऱ्या चेंडूवर सुनील नारायणला खाते न उघडता माघारी धाडलं. मात्र, हॅटट्रिक घेण्यापासून तो हुकला. अशाप्रकारे केकेआरने अवघ्या 35 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. त्याच्या या खेळीनंतर क्रिकेट जगतात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लाथाडलेल्या टीमचा कुलदीपनं बदला घेतला अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. गेल्या मोसमात कुलदीप यादव केकेआरचा भाग होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. म्हणजेच चालू मोसमात चांगली कामगिरी करून त्याने संघाकडून बदला घेतला आहे. दिल्लीकडून कुलदीप यादवने भेदक मारा केला. कुलदीपने कोलकात्याच्या चार महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीपने 4 षटकांत 14 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.

संबंधित बातम्या

त्याने गुरुवारी 2 षटकांत 2-2 बळी घेतले. डावाच्या 8व्या षटकात कुलदीपने सलग दोन चेंडूंवर बाबा इंद्रजीत आणि सुनील नरेन यांना बाद केले. इंद्रजीतने 8 चेंडूत 6 धावा केल्या, तर नरेन गोल्डन डकचा बळी ठरला. यानंतर त्याने तिसऱ्या षटकात 2 बळीही घेतले. 14व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला यष्टिचित केले. त्याने 37 चेंडूत 42 धावा केल्या. 4 चौकार मारले. गेल्या चार सामन्यांत केकेआरचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. केकेआरसाठी रिंकू सिंगने 16 चेंडूत 23 धावा केल्या. नितीश 34 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या