K L Rahul
नवी दिल्ली, 5 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) क्रिकेटपटू के एल राहुलला (K L Rahul) डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते सतत एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशातच केएल राहुलने नुकतंच एका मुलाखतीत खुलासा केला की, अनेकदा तो आणि अथियाचे वडील म्हणजे अभिनेते सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांच्यात कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलत असताना खटके उडतात. सुनील शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल राहुलला एका मुलाखती दरम्यान विचारले असता, त्याने खुलासा केला की या अभिनेत्याचे क्रिकेटबद्दल ठाम मत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सुनील शेट्टी हे क्रिकेटचे मोठं चाहता तर आहेच पण त्यांना खेळाची चांगली माहितीही आहे. दोघेही कधी कधी संवाद साधतात आणि वादही घालतात, असे राहुलने यावेळी सांगितले. शेट्टींना खेळ समजतो म्हणून ते प्रत्येक वेळी हुशारीने बोलतात. असही राहुलने यावेळी सांगितले. छोटा पॅकेट बडा धमाका, IPL 2022 मध्ये Uncapped खेळाडूंचे पाहायला मिळतंय वर्चस्व पुढे बोलताना राहुल म्हणाला की बॉलीवूड स्टार जीवन हे प्रशिक्षण आणि निरोगी जीवनशैलीवर अवलंबून आहे. वयाच्या 60 व्या वर्षीही सुनील शेट्टी फिट आहेत. असे राहुलने यावेळी सांगितले. तसेच, शेट्टी कुटूंबाशी माझे खुप चांगले नातं असल्याचे सांगत त्यांने त्यांचे कौतुक केले. अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत आहेत. पण या दोघांच्या रिलेशनशिपबाबतची माहिती जानेवारी 2020 मध्ये सूत्रांनी पक्की केली होती. दोघे नेहमी एकत्र असतात. अनेकवेळा ते स्पॉट झाले आहेत. मात्र, अद्याप दोघांनी प्रेमाची कबुली दिलेली नाही. सुनील शेट्टीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत अथिया के एल राहुलसोबत इंग्लंडला फिरायला गेली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत सुनील म्हणाला, ‘हो अशा चर्चा सुरु आहेत. पण मला यावर काहीच बोलायचे नाही.’ असे उत्तर देत सुनीलने त्यांच्या नात्याविषयी बोलणे टाळले होते.