कोलकाता, 20 डिसेंबर : भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी कोलकात्यात बोलताना दबाव सहन करू न शकणाऱ्या खेळाडूंचे कान टोचले आहेत. कपिल देव यांनी खेळाडूंना आपला स्वभाव बदलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, खेळाचा आनंद घ्या आणि जर दबाव सहन करू शकत नसाल तर क्रिकेट खेळणं बंद करा. दबावात रडणाऱ्या खेळाडूंनी केळीचं दुकान लावा, अंडी विका. एका खेळाडुला दबाव नाही तर देशाचं प्रतिनिधीत्व करताना अभिमान वाटला पाहिजे. कपिल देव यांनी दबाव सहन करू न शकणाऱ्या खेळाडूंना केळी आणि अंडी विकण्याचा सल्ला दिला. कोलकात्यातील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मी कोणत्याही खेळाडूला खेळाडू म्हणू शकत नाही जो दबाव सहन करू शकत नाही. हेही वाचा : अंडे का फंडा मेस्सीसमोर फिका, रोनाल्डोला जमलं नाही ते मेस्सीच्या पोस्टने केलं युवा खेळाडुंनाही कपिल देव यांनी सुनावले. ते म्हणाले की, मी ऐकलं की आम्ही आयपीएल खेळत आहे त्यामुळे आम्ही दबावात आहे. दबाव हा एक खूपच सामान्य शब्द आहे. हो ना? मी अशा खेळाडूंना म्हणेन की ज्यांना दबाव वाटतो त्यांनी क्रिकेट खेळू नये. तुम्हाला क्रिकेट खेळायला कोणी भाग पाडलेलं नाही. क्रिकेटमध्ये दबाव आणि स्पर्धा होणार, जर तुम्ही त्या पातळीवर खेळलात तर कौतुक आणि टीकाही होणार. तुम्ही घाबरता, टीका सहन करू शकत नाही तर मग खेळू नका.
हेही वाचा : अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलच फुटबॉल किंग तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही दबावात असता हे कसं होऊ शकतं. तुम्ही १०० कोटींहून अधिक लोकसंख्येच्या देशात भारतीय संघात खेळत आहात आणि तुम्हाला दबाव जाणवतोय. याऐवजी तुम्हाला भारतीय संघात खेळत असल्याचा अभिमान वाटायला हवा. या खेळाडुंनी स्वत:ला नशिबवान समाजायला हवं कारण तुम्हाला खूप प्रेम मिळत आहे. भारतासाठी खेळण्याचा अभिमान वाटून घ्यायला शिका. प्रत्येकाला हा आनंद मिळत नाही असंही कपिल देव यांनी म्हटलं.