मुंबई : आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव आज कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आले होते. आयपीएल 2023 साठी लिलाव प्रक्रिया संपली आहे. यामध्ये सर्व फ्रँचाइजींनी एकूण 109 खेळाडूंची खरेदी केली. यात 80 भारतीय तर 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावात दोन मोठे विक्रम झाले आहेत. सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला तर यष्टीरक्षक निकोलस पूरनला 16 कोटींना लखनऊने खरेदी केलं. यष्टीरक्षकाला मिळालेली ही सर्वात मोठी किंमत आहे.