Shoaib Akhtar
नवी दिल्ली, 8 एप्रिल: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेट संघाला जगावर राज्य करण्याचा मोठा सल्ला दिला आहे. शोएब अख्तरच्या मते, टीम इंडियाला(Team India) जगावर राज्य करायचे असेल तर स्टार भारतीय क्रिकेटपटूला नवा कर्णधार बनवावा लागेल असा मौलिक सल्ला दिला आहे. शोएब अख्तरने श्रेयस अय्यरला भविष्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी सर्वात मोठा दावेदार मानले आहे. रोहितनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ‘या’ खेळाडूचे नाव अग्रस्थानी ’श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये कर्णधारपद दाखवत आहे आणि भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठीही जोरदार दावा करत आहे. तो केवळ भारतीय संघात आपले स्थान पक्के करू पाहत नाही तर त्याला संघाचे नेतृत्वही करायचे आहे. असे अख्तरने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. स्वतःला सिद्ध करत आहे शोएब अख्तर पुढे म्हणाला, ‘श्रेयस अय्यर स्वत:ला सिद्ध करत आहे. श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये धावा करत आघाडी घेतली पाहिजे. मला खात्री आहे की तो आगामी काळात यशस्वी कर्णधार बनू शकेल. तसेच, शोएब अख्तरनेही भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेबद्दल आपलं मत मांडलं आहे. ‘अजिंक्य रहाणेने केकेआरने दिलेल्या संधींचा फायदा घ्यावा आणि हार मानू नये. असे सांगता शोएबने तो चमकदार कामगिरी करत राहील. असा विश्वास यावेळी व्यक्त केला. खेळाडूंकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे विराट कोहलीनंतर रोहित शर्मा टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळत आहे, पण बीसीसीआय अशा खेळाडूच्या शोधात आहे जो भविष्यात रोहित शर्मानंतर टीम इंडियाचे नेतृत्व करू शकेल. रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी 3 खेळाडूंकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे, ज्यात ऋषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यादरम्यान श्रेयस अय्यरही दावा मांडत आहे. श्रेयस अय्यर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे.