virender sehwag
नवी दिल्ली, 8 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग (IPL2022) च्या हंगामात मुंबई इंडियन्स (MI) ने तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या अपयशानंतर नेहमी मजेशीर ट्विट करत परखड मत व्यक्त करणाऱ्या विरेंद्र सेहवागने(Virender Sehwag) वडा पावचा उल्लेख करत 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या कमिन्सचे कौतुक केले. सेहवागच्या या ट्विटनंतर हिटमॅन रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते संतापले अन् सेहवागला ट्रोल करु लागले. या ट्रोलिंनंतर सेहवागने रोहितच्या चाहत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोलकाता विरूद्धच्या सामन्यात त्याचा फेव्हरेट रोहित पूल मारताना टॉप एज लागून आउट झाला. मुंबईने हा सामना गमावला यानंतर वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर रोहितचे चाहते मोठ्या प्रमाणात संतप्त झाले. रोहितबद्दल पझेसिव्ह असलेल्या काही चाहत्यांनी सेहवागला खडे बोल सुनावले. काय केले होते सेहवागने ट्विट ‘मु से निवाला नहीं वडापाव छिन लिया’ पॅट कमिन्सची ही खेळी ‘क्लिन हिटिंग’च्या सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे. 15 चेंडूत 56 धावा.” असे ट्विट करत कमिन्सचे कौतुक केले.
सेहवागच्या या ट्विटनंतर त्याची भूतकाळातील कामगिरी आणि फिटनेसचा अभाव समोर आणण्यासाठी त्याने हा संदर्भ रोहितला दिला असा आरोप चाहत्यांनी केला, या टीकेनंतर सेहवागने आणखी एक ट्विट केले आणि चाहत्यांची समजूत काढली. त्यात सेहवागने आपण वडापाव सेहवागला म्हटलं नसल्याचं सांगितलं. मद्यपान केलेल्या MIच्या खेळाडूने मला 15 व्या मजल्यावरून सोडले अन्…Yuzvendra Chahal ने शेअर केला ‘तो’ भयंकर किस्सा चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रियेवर सेहवागने आणखी एक ट्विट केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये माजी भारतीय खेळाडू म्हणाला की, वडा पाव हे मी एकूण मुंबई संघाशी संबंधीत म्हटले आहे. वडापावसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आहे. रोहितच्या चाहत्यांनो. मी तुमच्यापेक्षा त्याच्या (रोहित) फलंदाजीचा मोठा चाहता आहे.’
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या हंगामातील त्यांच्या तिसऱ्या विजयानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांचा संघ सध्याच्या हंगामातील सर्वात मजबूत संघ असल्याचे दिसत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला प्रत्येक सामन्यात वेगवेगळे सामनाविजेते मिळाले आहेत.