JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'तेरा हिरो इधर है' म्हणतं शुभमन गिलने टिंडरवर सुरु केलं अकाउंट

'तेरा हिरो इधर है' म्हणतं शुभमन गिलने टिंडरवर सुरु केलं अकाउंट

शुभमन गिलच्या फॅन फॉलोइंग विषयी बरीच चर्चा होत आहे. आतातर शुभमनने त्याच्या तरुण चाहतीच्या आग्रहाखातर टिंडरवर अकाउंट देखील सुरु केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी : भारताचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिल सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एका तरुणीने थेट पोस्टर हातात घेऊन टिंडर या डेटिंग अॅपला ‘शुभमनशी मॅच करून दे’ अशी विनंती केली होती. या पोस्टर गर्लचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. अशातच आता शुभमन त्या तरुणीसाठी टिंडरवर त्याच अकाउंट सुरु केलं आहे.

स्टेडियमवर हातात पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या तरुणीचा फोटो व्हायरल झाल्यावर टिंडर अॅपने याचा आपल्या जाहिरातीसाठी वापर केला. त्यांनी सर्वत्र जाहिरात करून त्यावर ‘शुभमन इधर तो देख लो’ असे म्हंटले. यावरून भारतीय क्रिकेटर उमेश यादवने ही शुभमनला ट्रोल करत “पुरा नागपूर बोल रहाहे शुभमन अभी तो देख ले” असे ट्विट करत म्हंटले. अखेर शुभमनने या गोष्टीची दखल घेऊन टिंडर अॅपवर आपले अकाऊंट सुरु केले. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला.

संबंधित बातम्या

शुभमनने त्याच्या टिंडर प्रोफाईलवर त्याचा फोटो ठेवत त्याला “तेरा हिरो इधर हे” असे कॅप्शन दिले. खरंतर टिंडर अॅप सोबत हे त्याचे पेड प्रमोशन होते. शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या टी २० मालिकेत आपले 6 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीनंतर त्याच्यावर सर्वस्थरावून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या