दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी असेल भारताची प्लेईंग XI?
तिरुअनंतपूरम**, 28** सप्टेंबर**:** भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना तिरुअनंतरपूरमच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक दिग्गज खेळाडंचा समावेश आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हन निवडताना दोन्ही कर्णधारांची कसोटी लागणार आहे. वर्ल्ड कपआधी भारताच्या दृष्टीनं ही मालिका महत्वाची ठरेल. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकाविजयानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. कशी असेल प्लेईंग इलेव्हन**?** तिरुअनंतपुरमच्या या पहिल्या टी20 सामन्यात प्लेईंग इलेव्हनबाबत बोलायचं झाल्यास पहिल्या चार नंबरवर रोहित, राहुल विराट आणि सूर्यकुमार यांची जागा फिक्स आहे. पाचव्या नंबरवर हार्दिक पंड्याच्या गैरहजेरीत रिषभ पंतला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही सामन्यांमध्ये रिषभ पंतला बाहेर बसावं लागलं होतं. हेही वाचा - Hardik Pandya: जेव्हा हार्दिक पंड्या पहिल्यांदा सासरच्या मंडळींना भेटतो… हार्दिकनं शेअर केला इमोशनल Video याशिवाय सहाव्या स्थानावर दिनेश कार्तिक, सातव्या नंबरवर अष्टपैलू अक्षर पटेल आणि त्यानंतर चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह रोहित शर्मा मैदानात उतरेल. त्यात दीपक चहर, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलचा नंबर कन्फर्म मानला जात आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग XI - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ - तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो
भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी20, ग्रीन फिल्ड स्टेडियम, तिरुअननंतपूरम संध्याकाळी 7.00 वाजता स्टार स्पोर्टस, डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण