युजवेंद्र चहल
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच तिरुवनंतपुरममध्ये आज (28 सप्टेंबर 22) होणार आहे. टीम इंडियाने नुकताच याच फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. आता ती टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सीरिज खेळणार आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही सीरिज जिंकल्यास भारतीय टीमचा आत्मविश्वास चांगलाच वाढेल. दरम्यान, भारतीय स्पिन बॉलर युजवेंद्र चहलने आतापर्यंत अनेकवेळा डीकॉकची विकेट घेतली आहे, त्यामुळे या सीरिजमध्ये त्याला चहलच्या स्पिन बॉलिंगपासून सावध राहून खेळावं लागणार आहे. चहल हा टीम इंडियाचा यशस्वी आणि अनुभवी बॉलर आहे. त्याने अनेकदा कठीणप्रसंगी भारतीय टीमसाठी उत्तम कामगिरी केली आहे. चहल आणि डी कॉकच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर यात चहल वरचढ ठरतो. चहलने आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये डीकॉकला टाकलेल्या 39 बॉल्सवर सहा वेळा त्याला आउट केलं आहे. त्यामुळे चहल भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर डीकॉकला जरा सावध राहून खेळावं लागेल. भारतीय टीम 2022 च्या T-20 वर्ल्ड कपपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिज खेळणार आहे. दोन्ही टीमच्या T-20 रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास भारतीय टीम वरचढ आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 11 वेळा T-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा सर्वाधिक पराभव केला आहे. या बाबतीत टीम इंडिया पाकिस्तानसोबत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे वाचा - जेव्हा हार्दिक पंड्या पहिल्यांदा सासरच्या मंडळींना भेटतो… पाहा Video दुसरीकडे, टीम इंडियामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये महत्त्वाचे खेळाडू नसल्याने त्याचा परिणाम टीमच्या कामगिरीवर होऊ शकतो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे, तर बॉलर मोहम्मद शमी करोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर पडले आहेत. तसंच, हार्दिक पंड्याला बीसीसीआयने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सीरिजमध्ये हे महत्त्वाचे खेळाडू खेळू शकणार नाहीत त्यामुळे संघाला त्यांच्याशिवायच चांगली कामगिरी करावी लागेल. हे वाचा - कांगारुंना हरवून टीम इंडिया रँकिंगमध्ये आणखी स्ट्राँग, पाहा ICC ची ताजी क्रमवारी दरम्यान, दोन्ही टीममधील पहिली T-20 मॅच आज (28 सप्टेंबर 22) होणार आहे. यानंतर दुसरी मॅच 2 ऑक्टोबरला गुवाहाटीत तर शेवटची मॅच इंदूरमध्ये 4 ऑक्टोबरला होणार आहे.