तर, पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रोहित शर्मा चौथा भारतीय खेळाडू आहे. याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली आहे.
विशाखापट्टणम, 04 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मानं टीम इंडियाची एक मोठी समस्या दूर केली आहे. टीम इंडियाला गेल्या काही वर्षात सलामीच्या फलंदाजांच्या चांगल्या जोडीची गरज होती. अखेर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्या रूपात भारताला ही जोडी मिळाली. रोहित आणि मयंक यांनी पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी करत 300 धावांची भागिदारी केली. निवड समितीनं रोहितवर दाखवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवला. 2018नंतर रोहितनं कसोटी सामना फक्त खेळला नाही तर शतकी कामगिरीही केली. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा रोहित आता कसोटीमध्येही आपले पाय रोवत आहे. या शतकी कामगिरीबरोबर रोहितनं डॉन ब्रॅडमन या दिग्गज फलंदाजाचीही बरोबरी केली आहे. त्यामुळं रोहितसाठी ही संधी खुपच महत्त्वाची होती. पहिल्या कसोटी सामन्यात रोहितनं 176 धावांची खेळी केली. तर, मयंक अग्रवालनं कसोटी मधले पहिले द्विशतक केले. मात्र आता मयंक आणि रोहित या दोन फलंदाजांमुळे अनेक फलंदाजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहे. वाचा- जडेजाच्या मिस्ट्री बॉलवर गोंधळला फलंदाज! क्रिकेट सोडून खेळायला लागला हॉकी या दोन फलंदाजांमुळे सलामीचे फलंदाज म्हणून संघात कमबॅक करण्यासाठी तयार असलेले शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांचे करिअर धोक्यात आले आहे. हे सर्व खेळाडू काही ना काही कारणामुळं कसोटी संघातून बाहेर आहे. मात्र आता मयंक आणि रोहितच्या तुफानी खेळीमुळं या फलंदाजांना संघात जागा मिळणे कठिण झाले आहे. हे सर्व खेळाडू घरेलु क्रिकेटमध्ये आणि स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पण टीम इंडियात स्थान मिळणे कठिण झाले आहे. वाचा- VIDEO : हिटमॅनचं ‘विराट’ स्वागत, कोहली झाला ‘द्वारपाल’ रोहित शर्माच्या नावावर अगणित रेकॉर्ड रोहित शर्मा हा भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक साजरं करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. तर सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे. रोहितने कसोटी पदार्पणातही शतक साजरं केलं होतं. याशिवाय गेल्या दहा वर्षांत शतक साजरं करताना चार षटकार मारणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे. वाचा- सलामीच्या ‘टेस्ट’मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद