VIDEO : हिटमॅनचं 'विराट' स्वागत, कोहली झाला 'द्वारपाल'

VIDEO : हिटमॅनचं 'विराट' स्वागत, कोहली झाला 'द्वारपाल'

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात सलामीला उतरल्यावर दीडशतकी खेळी केली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 03 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केला. रोहित शर्माचे दीडशतक आणि मयंक अग्रवालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने दावांचा डोंगर उभा केला. भारताचा हिटमॅन रोहित शर्माने 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकार लगावले. सलामीवीर म्हणून कसोटीत पहिल्यांदाच उतरताना रोहित शर्माने शतक झळकावले. त्याने मयंक अग्रवालसह पहिल्या विकेटसाठी 317 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा 82 व्या षटकात फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी कर्णधार विराट कोहली त्याच्या स्वागतासाठी दरवाजाजवळ उभा होता. ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्मा पोहचण्यापूर्वी विराट दरवाजाजवळ येऊल थांबला होता. रोहित शर्मा तिथं येताच विराटने त्याच्या पाठीवर थाप मारली. रोहित आत गेल्यानंतर विराटने स्वत: दरवाजा बंद केला. सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे.

वर्ल्ड कपनंतर दोघांमध्ये मतभेद असल्याचं म्हटलं जात होतं. संघात सर्व काही सुरळीत असल्याचं निवड समितीसह संघातील खेळाडूंनीही स्पष्ट केलं होतं. विराटने देखील विंडीज दौऱ्यापूर्वी याबाबत खुलासा केला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक करताच रोहित शर्माची भारतीय मैदानावरील सरासरी 98.22 इतकी झाली. यासह त्याने ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली . कसोटीमध्ये डॉन ब्रॅडमन यांची सरासरी 99.9 इतकी आहे. त्यांनी घरच्या मैदानावर 98.22 इतक्या सरासरीने धावा केल्या होत्या. आता रोहित शर्मानेही त्यांची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने भारतात 10 कसोटीत 98.22 च्या सरासरीने 884 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित शर्मा हा भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक साजरं करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. तर सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे. रोहितने कसोटी पदार्पणातही शतक साजरं केलं होतं. याशिवाय गेल्या दहा वर्षांत शतक साजरं करताना चार षटकार मारणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे.

एकनाथ खडसेंबद्दल शरद पवारांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले...

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 5:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading