विशाखापटण्णम, 04 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरोधात होत असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कमाल केली. पहिल्या दिवशी सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल शानदार फलंदाजी केल्यानंतर अश्विन आणि जडेजानं आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. भारतानं दुसऱ्या दिवशी 502 धावांवर पहिली डाव घोषित केला. तर, आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्याच डावात आफ्रिकेच्या तीन विकेट गेल्या. त्यानंतर कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि एल्गर यांनी डाव सावरला. त्यामुळं फाफ आणि एल्गर यांची जोडी फोडण्यासाठी कर्णधार विराट कोहलीनं रवींद्र जडेजाला पाचारण केले. यावेळी जडेजानं टाकलेल्या चेंडूची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. फॅफ फलंदाजी करत असताना जडेजानं एक, दोन नाही तर चार टप्प्यांचा चेंडू टाकला. या डेड बॉलमुळं फलंदाजही बुचकळ्यात पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एल्गरचे शानदार शतक दुसऱ्या दिवशी 27 धावा केलेल्या एल्गरनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एल्गरनं 112 चेंडूवर 6 चौकार आणि 1 षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच 175 चेंडूत शतकी खेळी केली. दरम्यान 2010नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतात कसोटीमध्ये शतकी खेळी केली आहे. 2009मध्ये हाशिम अमलानं भारताविरोधात शतकी खेळी केली होती. VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

)







