कधी सुरु होणार भारत-पाकिस्तान मॅच?
मेलबर्न, 22 ऑक्टोबर: गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटविश्वातले पारंपरिक प्रतिस्पर्धी तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. निमित्त आहे ते ऑस्ट्रेलियात आयोजित टी20 वर्ल्ड कप चं. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड हे जगातलं सर्वात मोठं दुसरं क्रिकेट ग्राऊंड. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड वर रविवारी तब्बल 90 हजार प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. तर जगभरात करोडो चाहते हे सामना टीव्ही किंवा मोबाईलवर लाईव्ह पाहणार आहेत. भारतीय वेळेनुसार कधी सुरु होणार भारत पाकिस्तान मॅच? ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल. पण भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या प्रमाणवेळेत 5.30 तासांचा फरक आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. भारत-पाकिस्तान मॅच सुरु होईल. कोणत्या चॅनेलवर दिसणार मॅच? टी20 वर्ल्ड कपच्या सगळ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरुन केलं जात आहे. तर लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जातंय.
मेलबर्नमध्ये वेळेवर सुरु होणार सामना? गेल्या काही दिवसांपासून मेलबर्नमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच कारणामुळे या सामन्यावरही अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते. पण आज दिवसभर मेलबर्नमध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रविवारीही मेलबर्नमध्ये असंच वातावरण राहिलं तर पूर्ण ओव्हर्सचा खेळ होण्याचा अंदाज आहे.
कशी असणार प्लेईंग इलेव्हन? हवामानाच्या अनिश्चिततेमुळे दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आपल्या प्लेईंग इलेव्हनचा खुलासा केलेला नाही. मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितनं म्हटलं की, ‘मेलबर्नमध्ये हवामान दर मिनिटाला बदलत आहे. उद्या सकाळी असलेल्या परिस्थितीनुसार आम्ही आमची प्लेईंग इलेव्हन ठरवू. कारण आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत थांबावं लागेल.’ हेही वाचा - Ind vs Pak: ‘या’ तिघांना रोखा, मॅच जिंका… पाहा पाकविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या मार्गातील 3 अडथळे भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान