टीम इंडियाचे खेळाडू फुटबॉल खेळताना
नेपियर, 22 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातला तिसरा टी20 सामना आज नेपियरमध्ये होत आहे. टीम इंडियानं दुसरी टी20 65 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे नेपियरमधल्या तिसऱ्या टी20 सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न राहील. पण या तिसऱ्या सामन्यापूर्वी पावसानं पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे. निर्धारित वेळेनुसार 11.30 वाजता टॉसची वेळ होती. पण पावसामुळे सामना वेळेत सुरु झाला नाही. मात्र या रिकाम्या वेळेत खेळाडू मात्र क्रिकेट नाही तर फुटबॉलचा आनंद घेतला. क्रिकेट नही तो फुटबॉल सही… दरम्यान पावसाची रिपररिप आणि ढगाळ वातावरणामुळे सामना वेळेत सुरु होत नसल्याचं पाहून भारतीय खेळाडू मात्र मैदानात उतरले. पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी क्रिकेटऐवजी फुटबॉल खेळणं पसंत केलं. रिषभ पंत, संजू सॅमसन, दीपक हुडासह इतर खेळाडू यावेळी मैदानात फुटबॉल खेळताना दिसले.
कसं आहे नेपियरमधलं वातावरण? वेलिंट्नच्या पहिल्या टी20 सामन्याप्रमाणेच नेपियरमध्येही पाऊस आणि काळ्या ढगांचं राज्य आहे. त्यामुळे मॅच सुरु झाली तरी मध्ये मध्ये पावसाचा व्यत्यय येण्याचीही शक्यता आहे.
न्यूझीलंडनं जिंकला टॉस दरम्यान न्यूझीलंडनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कॅप्टन हार्दिक पंड्या आणि भारतीय संघव्यवस्थान भारतीय संघात एक बदल केला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला संघात स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंडकडून केन विल्यम्सन दुखापतीमुळे हा सामना खेळणार नाही. त्याच्या जागी युवा खेळाडू माईक चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे.