भारत-न्यूझीलंड वन डे रद्द
हॅमिल्टन, 27 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा वन डे सामना अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. आजच्या दिवसात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. नियोजित वेळेनुसार सामना सुरु झाला खरा पण दोन वेळा पावसानं हजेरी लावली आणि मॅचमध्ये अडथळा आणला. अखेर पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्यानं आणि किमान 20 ओव्हर्सचा खेळही शक्य नसल्यानं शेवटी ही मॅच रद्द करण्यात आली. दरम्यान तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडनं मात्र आपली आघाडी कायम ठेवली आहे. न्यूझीलंड 1, भारत 1, पाऊस 2 दरम्यान टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यावर आतापर्यंत पावसामुळे रद्द झालेला हा दुसरा सामना ठरला. टी20 मालिकेत भारतानं एक सामना जिंकला होता. तर न्यूझीलंडनं ऑकलंडची पहिली टी20 जिंकली. त्याआधी तिसरी टी20 पावसामुळेच टाय झाली होती. पण पावसानं मात्र दोन सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. वेलिंग्टनमध्ये झालेली पहिली टी20 पावसामुळे वाया गेली होती. त्यानंतर आज हॅमिल्टनमध्ये पावसानंच बाजी मारली. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडनं एकेक सामना जिकला असला तरी पाऊस मात्र दोन सामने जिंकून सध्या आघाडीवर आहे.
हेही वाचा - Cricket: ना पाऊस, ना बॅडलाईट… या अनोख्या कारणासाठी अम्पायर्सनी थांबवली मॅच, पाहा काय घडलं? ख्राईस्टचर्चमध्ये अखेरची वन डे वन डे मालिकेतला तिसरा सामना आता 30 नोव्हेंबरला ख्राईस्टचर्चमध्ये होणार आहे. टी20 प्रमाणे आता टीम इंडियाची वन डे मालिका जिंकण्याची संधी हुकली आहे. पण भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.