सिडनी, 27 नोव्हेंबर: एखादा क्रिकेट सामना थांबवण्याचं सर्वात मोठं कारण पाहायला मिळतं ते म्हणजे पाऊस किंवा खराब हवामान. पण ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या वुमन्स बिग बॅश लीगच्या फायनलमध्ये एका अनोख्या कारणासाठी मॅच थांबवण्यात आली. क्रिकेटच्या मैदानात हे फार क्विचितच पाहायला मिळतं. अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातला हा अंतिम सामना सिडनीत पार पडला. या मॅचमध्ये तब्बल 15 मिनिटं खेळ थांबवण्यात आला होता. आणि याचं कारण ठरलं सूर्याची किरणं. सूर्यप्रकाशामुळे खेळात व्यत्यय पावसामुळे खेळात व्यत्यय आलेला तुम्ही पाहिला असेल. पण काल चक्क प्रखर सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. बिग बॅश लीगच्या फायनलमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सची इनिंग संपल्यानंतर सिडनी सिक्सर्सची सूझी बेट्स बॅटिंगसाठी मैदानात आली. पण सूर्याची किरणं थेट सूझी बेट्सची डोळ्यांवर पडत असल्यानं अम्पायर्सनी काही वेळासाठी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी अम्पायरनी खेळ का थांबवला याची कल्पना मैदानातल्या अनेक खेळाडूंनाही नव्हती. या घटनेचा व्हिडीओ स्काय स्पोर्टसनं शेअर केला आहे.
"I don't understand why we're waiting"...
— Sky Sports News (@SkySportsNews) November 26, 2022
... "I need to be able to see!"
Play has been delayed due to the sun being in the batters eyes in the WBBL final ☀️🏏 pic.twitter.com/XLFTiBFqOm
हेही वाचा - FIFA WC 2022: मेसीच्या जादूने अर्जेन्टिना पुन्हा ट्रॅकवर, पाहा मेक्सिकोविरुद्ध मेसीनं काय केली कमाल? दरम्यान कमी सूर्यप्रकाशामुळे म्हणजेच बॅडलाईटमुळे खेळ थांबवल्याचं अनेक वेळा आपण पाहिलं असेल. पण कदाचित प्रखर सूर्यप्रकाशामुळे मॅच थांबवण्याची ही पहिलीच घटना असावी.