पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द
वेलिंग्टन, 18 नोव्हेंबर: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचलेल्या टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस निराशेचा ठरला. वेलिंग्टनमध्ये आजपासून भारत आणि न्यूझीलंड संघातली टी20 मालिका सुरु झाली. पण या मालिकेतला पहिलाच सामना पावसामुळे पूर्णपणे वाया गेला. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 12 वाजता सुरु होणं अपेक्षित होतं. पण जोरदार पावसामुळे नियोजित वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही. त्यानंतर निर्धारित वेळेनंतरही पाऊस थांबण्याची कुठलीही चिन्ह नसल्यानं अम्पायर्सनी शेवटी ही पहिली मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पाऊस… पाऊस आणि फक्त पाऊस वेलिंग्टनमध्ये आज सकाळपासूनच पाऊस आणि काळ्या ढगांचं राज्य होतं. त्यामुळे सामना होईल की नाही हीच शंका होती. अखेर ती खरी ठरली. पाऊस इतका होता की दोन्ही संघातले खेळाडूही ड्रेसिंग रुमच्या बाहेरही आले नाहीत. काही खेळाडूंनी इनडोअर जागेत फुटबॉल-व्हॉलीबॉलचा आनंद लुटला. दरम्यान या मालिकेतले उर्वरित दोन सामना 20 आणि 22 नोव्हेंबरला होणार आहेत.
हेही वाचा - FIFA World Cup 2022: टी20 चॅम्पियनपेक्षा फिफा वर्ल्ड कपमधली 32वी टीम होणार मालामाल, फिफासमोर ICC म्हणजे… उर्वरित टी20 सामन्यांचं शेड्यूल 20 नोव्हेंबर, दुसरी टी20 - माऊंट माँगानुई 22 नोव्हेंबर, तिसरी टी20 - नेपियर दोन्ही सामने भारती वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरु होतील.