JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / तरुण खेळाडुंनी विराटकडून शिकावं; एका धावेवर बाद झाल्यावरही राहुल द्रविडने केलं कौतुक

तरुण खेळाडुंनी विराटकडून शिकावं; एका धावेवर बाद झाल्यावरही राहुल द्रविडने केलं कौतुक

मुंबई, १५ डिसेंबर : बांगलादेशविरुद्ध भारताची कसोटी मालिका कालपासून सुरू झाली आहे. पहिल्या डावात विराट कोहलीला फक्त एकच धाव करता आली. मात्र तरीही भारताचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटचं कौतुक केलं आहे. विराटला फलंदाजीत फारशी कमाल करता आली नसली तरी तरुणांनी विराटकडून शिकावं असं राहुल द्रविडने म्हटलं आहे. भारताने पहिल्या डावात आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानतंरसुद्धा आर अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने म्हटलं की, विराट कोहलीचा सराव नेहमीच चांगला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, १५ डिसेंबर : बांगलादेशविरुद्ध भारताची कसोटी मालिका कालपासून सुरू झाली आहे. पहिल्या डावात विराट कोहलीला फक्त एकच धाव करता आली. मात्र तरीही भारताचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटचं कौतुक केलं आहे. विराटला फलंदाजीत फारशी कमाल करता आली नसली तरी तरुणांनी विराटकडून शिकावं असं राहुल द्रविडने म्हटलं आहे. भारताने पहिल्या डावात आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानतंरसुद्धा आर अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने म्हटलं की, विराट कोहलीचा सराव नेहमीच चांगला आहे. आजही तो अफलातून असा आहे. ज्या पद्धतीने विराट तयारी करतो तो तरुण खेळाडुंना एक धडा आहे. विराट कोहली संघासाठी चांगली कामगिरी करतो आणि आपलं सर्वस्व देतो. विराटमध्ये धावांसाठी असलेली भूक दिसून येते. हेही वाचा :  मांजराला त्रास देणं पडलं महागात, ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनला 1.56 कोटींचा दंड बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. मात्र एका धावेवर ताजीजुलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. विराट कोहली फक्त पाचच चेंडू खेळला. यानंतर विराटचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पहिल्या डावात बाद झाल्यानतंर संघाचे खेळाडू जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आराम करत होते तेव्हा विराट नेटमध्ये सराव करत होता. हेही वाचा :  केन विल्यम्सनने कसोटी कर्णधारपद सोडलं, का घेतला निर्णय? विराट कोहली विकेटकीपिंग प्रॅक्टिस करत होता. विराटला फलंदाजी करताना धावा करता आल्या नसल्या तरी त्याने सरावात कसूर ठेवलेली नाही. कोहलीने बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक केलं होतं. हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 72 वे शतक होते. बांगलादेशविरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता राहुल द्रविडने केलेलं कौतुकही महत्त्वाचं ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या