वॉशिंग्टन सुंदर
ख्राईस्टचर्च, 30 नोव्हेंबर: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. वॉशिंग्टन सुंदरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा डाव 47.3 ओव्हर्समध्ये 219 धावात आटोपला. वॉशिंग्टन सुंदरनं 51 धावांची खेळी करुन टीम इंडियाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. त्याचं वन डे क्रिकेटमधलं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. पण इतर भारतीय फलंदाजांनी ख्राईस्टचर्चच्या निर्णायक वन डेत निराशा केली. आघाडीची फळी कोसळली.. भारताचे सलामीवीर आणि आघाडीच्या फळीनं आज निराशा केली. पहिल्या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या शुबमन गिलनं फक्त 13 धावा केल्या. तर कॅप्टन शिखर धवनही 28 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 49 धावांवर असताना खराब फटका खेळून तो बाद झाला. भारताचा निम्मा संघ 121 धावातच तंबूत परतला होता. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं एका बाजून भारताला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने आणि डॅरिल मिचेलनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर साऊदीनं 2 फलंदाजांना माघारी धाडलं.
सूर्यकुमार वन डेत फ्लॉप टी20 क्रिकेटमध्ये हीरो ठरलेला सूर्यकुमार यादव वन डेत मात्र खास कामगिरी करु शकला नाही. आजच्या सामन्यात तो केवळ 6 धावा काढून बाद झाला. सूर्यकुमारला एक मोठी खेळी करण्याची एक चांगली संधी होती.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: हा जिथे जातो तिथे सुरु होतो… टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूनं पाहा मॅचआधी काय केलं? Video पंतला अजून किती चान्स? टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. या सीरीजमध्ये पंतनं केवळ 31 धावा केल्या त्याही तीन सामन्यात. त्यामुळे तरीही टीममध्ये मिळणाऱ्या संधीवरुन आता बीसीसीआयला धारेवर धरलं जात आहे. याऊलट संजू सॅमसननं या सीरीजमध्ये केवळ एक मॅच खेळून 36 धावा केल्या होत्या. पण त्याला पुढच्या दोन मॅचमध्ये ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागलं.