मुंबई, १० जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंका विरुद्ध टी २० मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेत मालिका जिंकली होती. आता सर्वांचे लक्ष हे भारत श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन डे मालिकेकडे लागले आहे. परंतु काल मालिकेच्या एक दिवस आधी टिम इंडियाला मोठा धक्का बसला. दुखापतीच्या कारणामुळे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्लेयिंग ११ मध्ये कोणता खेळाडू बुमराहची बाजू घेणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. आजच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून त्यापूर्वी टीम इंडियाची प्लेयिंग ११ जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतर बीसीसीआयने बुमराह फिट असल्याचं सांगताना वन डे मालिकेच्या संघात त्याचा समावेश केला होता. मात्र काल वन डे मालिकेला एक दिवस शिल्लक असताना पुन्हा एकदा बुमराह फिट नसल्याचे सांगून बीसीसीआयने त्याला विश्रांती दिली आहे. वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत श्रीलंकाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून आता भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या दरम्यान आजच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाचा प्लेयिंग ११ संघ जाहीर झाला आहे. यात जसप्रीत बुमराहची जागा मोहम्मद शमीने घेतली आहे. बुमराह सह या वेळी प्लेयिंग ११ मध्ये श्रीलंका विरुद्ध टी २० मालिका गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवला देखील विश्रांती देण्यात आली आहे. हे ही वाचा : आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे मालिकेला सुरुवात; कधी, कुठे पहाल सामना? अशी आहे टीम इंडियाची प्लेयिंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल अशी आहे टीम श्रीलंकाची प्लेयिंग ११ : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका