जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे मालिकेला सुरुवात; कधी, कुठे पहाल सामना?

आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे मालिकेला सुरुवात; कधी, कुठे पहाल सामना?

आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे मालिकेला सुरुवात; कधी, कुठे पहाल सामना?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेनंतर आजपासून श्रीलंका विरुद्ध वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे सामन्यात कोणता संघ बाजी मारून मालिका विजय प्राप्त करेल याकडे सर्वांचे लक्ष असेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, १० जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी २० मालिकेनंतर आजपासून श्रीलंका विरुद्ध वनडे  मालिकेला सुरुवात होणार आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान पारपडलेली टी २० मालिका भारताने २-१ ने आघाडी मिळवत जिंकली. आता वनडे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून यात कोणता संघ कोणावर भारी पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. वन डे मालिकेत भारतीय संघात मोठे बदल होणार असून यात विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक अनुभवी खेळाडू संघात परतणार आहेत. आज १० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या वन डे मालिकेचा शेवटचा सामना १४ जानेवारी रोजी होणार असून हे सामने डे नाईट खेळवले जाणार आहेत. कधी होणार सामना : भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेत पहिला सामना सोमवारी 10 जानेवारी रोजी दुपारी 1:30 ला सुरु होईल. या सामन्यापूर्वी अर्धातास आधी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. श्रीलंका विरुद्ध वन डे मालिकेतील पहिला सामना आसामच्या गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे.  बालसपारा क्रिकेट स्टेडियम  हा सामना रंगणार असून दोन्हीही संघांमध्ये पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याकडे कल असेल. टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी यावेळी रोहित शर्माकडे असणार आहे. हे ही वाचा :  IND vs SL : …ज्याने मोडला रोहितचा विक्रम, त्यालाच हिटमॅनने केलं ड्रॉप! मॅचआधीच उघडले पत्ते कुठे पहाल सामना : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारी वन-डे मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीवी चैनल्सवर पाहता येईल. तसेच याचे लाईव्ह प्रक्षेपण डिझनी+हॉटस्टार अँपवर देखील पाहता येणार आहे. तसेच क्रिकेट रसिकांना हा वनडे सामना जिओ टीव्हीवर लाईव्ह देखील पाहता येणार आहे. वन -डे मालिकेसाठी संघ : भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह. श्रीलंका संघ: दासुन शनाका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, अशान बंडारा, वानिंदु हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदु फर्नांडो, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, पाथुम निसंका, प्रमोद मदुशन, कासुन राजिथा, सादीरा समरविक्रमा, महीष तीक्षणा, जेफ्री वांदरसे, दुनिथ वेलालगे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात