मुंबई, 16 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु पहिला कसोटी सामना सुरू आहे. दुखापतीमुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. दरम्यान, आता त्याच्या प्रकृतीबाबत आणि तो दुसऱ्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्मा अचानक भारतात परतला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तरी तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजीसाठी उतरला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा तयार असूवन तो लवकरच बांगलादेशमध्ये पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 22 डिसेंबर रोजी दुसरा कसोटी सामना होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या कसोटीसाठी रोहित उपलब्ध असून तो आज किंवा उद्या १८ डिसेंबर रोजी बांगलादेशला रवाना होईल असं म्हटलं जात आहे. हेही वाचा : भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची बँक खाती गोठवली, वसूल केले लाखो रुपये रोहित शर्माला एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यावेळी हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो अखेरच्या एकदिवसीय सामन्याला मुकला होता. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. बांगालदेशविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही केएल राहुलने भारतीय संघाचे नेतृत्व केलं होतं.