जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची बँक खाती गोठवली, वसूल केले लाखो रुपये

भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची बँक खाती गोठवली, वसूल केले लाखो रुपये

भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची बँक खाती गोठवली, वसूल केले लाखो रुपये

भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची दोन बँक खाती गोठवण्यात आली आहे. तसंच गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी त्याच्या बँक खात्यातून लाखो रुपये वसूल केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलवर नोएडा प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरीटीने त्याची दोन बँक खाती गोठवली असून ५२ लाख रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे. मुनाफ पटेलची बिल्डिर कंपनी निवास प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड असून तो यामध्ये संचालक आहे. युपी रेराने मुनाफ पटेलच्या कंपनीने गुंतवणूकदारांची रक्कम परत न केल्याच्या आरोपानंतर ही कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांनी सांगितले की, युपी रेराने बिल्डरविरोधात कारवाई केली. या कंपनीत मुनाफ पटेलसुद्धा संचालक आहे. बँक खाती गोठवण्यात आली असून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रेटर नोएडा वेस्ट सेक्टर १० मध्ये निवास प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत वनलीफ ट्रॉय नावाच्या योजनेवर काम सुरू आहे. ही योजना वेळेत पूर्ण न झाल्यानं बिल्डरविरोधात युपी रेरामध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर युपी रेराने बिल्डरविरुद्ध आदेश जारी केला होता. हेही वाचा :  अमेरिकेचा संघ पण सगळेच भारतीय, खेळाडु ते निवड समितीही भारतीयच आदेशाचे पालन न केल्यानं युपी रेराने बिल्डरला नोटीस दिली होती. जिल्हा प्रशासनाकडे बिल्डरविरुद्ध १० कोटी रुपयांच्या ४० हून जादा RC पेंडिंग आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी दादरी तहसील पथकाने वसुलीचा प्रयत्न केला. मात्र बिल्डरने पैसे दिले नाहीत. यानंतर तहसीलच्या टीमने कायदेशील सल्ला घेतल्यानंतर कंपनीच्या संचालकांकडून वसुली सुरू केली आहे. हेही वाचा :  रोनाल्डोला बेंचवर बसवलेल्या पोर्तुगालच्या प्रशिक्षकांचा राजीनामा, FPFने दिली माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रिकेटपटू मुनाफ पटेल कंपनीचा संचालक आहे. त्यांची नोएडा आणि गुजरातमध्ये अॅक्सिस बँकेच्या दोन शाखांमध्ये दोन खाती असून ती गोठवली आहेत. त्यानतंर रक्कम वसूल केली आहे. दोन्ही खात्यांमधून ५२ लाख रुपये वसूल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध पुढेही कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात