मुंबई, 9 जानेवारी : भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका विरुद्ध टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत ठोकलेल्या जबरदस्त शतकामुळे त्याची सध्या सर्वत्रच चर्चा सुरु आहे. अशातच पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट्ट सूर्याचे तोंडभरून कौतुक केले. सलमानने सूर्याची प्रशंसा करताना, सूर्यकुमार जर आमच्या संघात असता तर काय झाले असते याबाबत सांगितले. श्रीलंके विरुद्ध टी 20 मालिकेतील तिसरा सामना भारताने 91 धावांनी जिंकला. या सामन्यात सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावांची केलेली खेळी लक्षवेधी ठरली. सूर्याने याखेळीत तब्बल 7 चौकार आणि 9 षटकार ठोकले. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट्ट याने त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओत सलमानने सूर्यकुमारची प्रशंसा केली. तो म्हणाला, सूर्यकुमार हा जर पाकिस्तानमध्ये असता तर त्याला पाकिस्तानच्या क्रिकेट संघात खेळण्याची संधीच मिळाली नसती. हे ही वाचा : IND VS SL : सूर्यकुमारने राजकोटच्या मैदानावर तोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट म्हणाला की, सूर्याच वय 30 असताना त्याने भारतीय क्रिकेट संघात डेब्यू केला. मी विचार करतो की तो नशीबवान आहे की तो भारतीय आहे. कारण जर तो पाकिस्तानमध्ये असता तर त्याला पाकिस्तान संघात खेळण्याची कधीच संधी मिळाली नसती. कारण पाकिस्तान संघात 30 वयानंतर खेळाडूला संधी दिली जात नाही. पुढे तो म्हणाला, पाकिस्तान संघात असलेल्या खेळाडूंना याबाबत काहीच हरकत नाही पण 30 वयानंतर क्रिकेटमध्ये डेब्यू करणे काही सोपे काम नाही. सूर्याचा हा कमालीचा चतुर खेळाडू आहे. तो प्रत्येक बॉलर कोणता बॉल टाकेल हे समजून खेळतो. सूर्यकुमार यादवने वय वर्ष 30 असताना भारतीय संघात पदार्पण केले. आयपीएल मध्ये केलेल्या तुफान खेळीनंतर सूर्यकुमारला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. 2022 मध्ये सूर्यकुमार टी 20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.