मुंबई, 8 जानेवारी : शनिवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेला टी 20 मालिकेतील तिसरा सामना अत्यंत रोमांचक ठरला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-1 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवची खेळी अतिशय लक्षवेध ठरली. सूर्यकुमार यादवने केवळ 51 चेंडूत 112 धावांची शतकी खेळी केली. तसेच त्याला सामन्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. सूर्यकुमारने शतकी खेळी सोबतच भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा राजकोटच्या क्रिकेट मैदानावरील रेकॉर्ड ही मोडीत काढला. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्मावर राजकोटच्या मैदानावर भारताकडून खेळताना सर्वाधिक टी 20 धावा करण्याचा रेकॉर्ड होता. रोहित शर्माने सौराष्ट्र क्रिकेट संघ स्टेडियमवर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन सामन्यांमध्ये 98 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा त्याचा पहिलाच सामना काल श्रीलंकेविरुद्ध राजकोटच्या मैदानावर खेळला. यापहिल्या सामन्यातच विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 112 धावा केल्या. या खेळी सह त्याने भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिलेच मात्र त्याने रोहित शर्माचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड देखील मोडला. हे ही वाचा : सूर्यकुमारकडून काढून घेण्यात आले होते कर्णधारपद; टीम मधूनही दाखवला होता बाहेरचा रस्ता आता राजकोटच्या मैदानावर सर्वाधिक टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर यात आता पहिल्या क्रमांकावर 112 धावांसह सूर्यकुमार आहे. त्याच्या खालोखाल 98 धावांसह रोहित शर्मा तर 94 धावांसह विराट कोहली आहे. तसेच यादीत चौथ्या क्रमांकावर 77 धावांसह भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह असून पाचव्या क्रमांकावर 73 धावांसह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.