मुंबई, 25 जानेवारी : ICC 2022 चे पुरस्कार 24 जानेवारी पासून घोषित करण्यात येत आहेत. 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 13 वैयक्तिक पुरस्कारांसह विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आयसीसीच्या पुरुष कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यंदा संघात केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत याला आयसीसीने पुरुष कसोटी संघात स्थान दिले आहे. रिषभ पंत हा सलग दुसऱ्यांदा आयसीसीच्या कसोटी संघात निवडला गेला आहे. यंदा पुरुष कसोटी संघाचे नेतृत्व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे. तर संघात 4 ऑस्ट्रेलियन तर 3 इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. हे ही वाचा : आयसीसीकडून पुरुष आणि महिला वनडे टीमची घोषणा; भारतीय खेळाडूकडे संघाचे कर्णधारपद रिषभ पंत याचा 30 डिसेंबर रोजी कार अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा क्रिकेट मैदानात उतरण्यासाठी पंतला बराच कालावधी लागणार आहे.
असा आहे आयसीसीच्या पुरुष कसोटी संघ :