मुंबई, 25 जानेवारी : ICC 2022 चे पुरस्कार 24 जानेवारी पासून घोषित करण्यात येत आहेत. 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 13 वैयक्तिक पुरस्कारांसह विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आज आयसीसीच्या पुरुष आणि महिला वनडे टीमची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी महिला संघाचे कर्णधारपद भारतीय महिला खेळाडूला देण्यात आले आहे.
आयसीसीने निवडलेल्या पुरुष वनडे संघात 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या भारतातील श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पुरुष वनडे संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे देण्यात आले आहे.
हे ही वाचा : शुभमन गिलने केली कमाल! बाबर आझमच्या या विक्रमाशी केली बरोबरी
असा आहे आयसीसीचा पुरुष वनडे संघ :
आयसीसीने निवडलेल्या महिला वनडे संघात 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या भारतातीलस्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, रेणुका सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. तर महिलावनडे संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू हरमनप्रीत कौर कडे देण्यात आले आहे.
असा आहे आयसीसीचा महिला वनडे संघ :
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Indian women's team, Team india