JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'मी आधी धोनीसाठी खेळलो, मग देशासाठी' असं का म्हणाला सुरेश रैना?

'मी आधी धोनीसाठी खेळलो, मग देशासाठी' असं का म्हणाला सुरेश रैना?

एम एस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सुरेश रैनाने देखील अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या प्रसंगाबद्दल एका मुलाखतीत बोलताना सुरेश रैनाने अनेक खुलासे केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 फेब्रुवारी : भारताचा माजी ऑलराउंडर- क्रिकेटर सुरेश रैना याने भारतीय संघासाठी खेळत असताना स्वबळावर अनेक सामने जिंकले. अडचणीच्या वेळी संघाने टाकलेल्या विश्वासावर तो अनेकदा खरा उतरला. परंतु 15 ऑगस्ट 2020 रोजी माजी कर्णधार एम एस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सुरेश रैनाने देखील अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या प्रसंगाबद्दल एका मुलाखतीत बोलताना सुरेश रैनाने अनेक खुलासे केले. सुरेश रैना निवृत्तीच्या प्रसंगाबद्दल बोलताना म्हणाला की, माझी आणि धोनीची गोष्ट एकसारखी आहे. धोनी देखील रांची सारख्या छोट्या शहरातून आलो आणि मी देखील गाज़ियाबाद येथून क्रिकेट विश्वात आलो. रैनाने सांगितले, मी धोनीसोबत अनेक क्रिकेट सामने खेळलो, आयपीएलच्या चेन्नई संघातून खेळताना देखील  त्याच्या सोबत खूप वेळ घालवण्याची संधी मिळाली. धोनी एक उत्कृष्ट लीडर आणि खूप चांगला माणूस आहे, त्याच्याशी असलेल्या या स्पेशल कनेक्शनमुळे मी नेहमी आधी धोनीसाठी खेळलो आणि मग देशासाठी.

सुरेश रैना ने 30 जुलै 2005 रोजी भारतीय संघात पदार्पण केले. त्याने भारतासाठी 226 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने 5615 रन केले आहेत. तर 18 कसोटी मालिकांमध्ये  त्याने 768 रन बनवले. रैना हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर असून त्याने 78 टी-20 सामन्यात 1604 रन केले होते. परंतु कोणाच्या ध्यानी मनी नसताना 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी महेंद्र सिंह धोनी ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अचानकपणे काही वेळाने सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या