
रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची पहिली कार मारुती ओमनी होती. त्याच्या चाहत्यांनाही याबद्दल माहीत नसेल. रिपोर्ट्सनुसार, ही त्याला त्याच्या आईने भेट दिली होती आणि ती त्याच्यासाठी अमूल्य आहे.

बॉलिवूडच्या शहेनशाहच्या गॅरेजमध्ये हेवा वाटेल, अशा गाड्या आहेत. अमिताभ बच्चन यांची पहिली कार फियाट 1100 ही होती. ही 1089cc - 1221cc इंजिन असलेली सेकंड-हँड कार होती.

सचिन तेंडुलकर हा सर्वात दिग्गज क्रिकेटपटू आहे. मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणार्या, सचिनकडे 360 मोडेना फेरारी आहे, जी त्याला F1 दिग्गज मायकेल शूमाकरने भेट दिली होती. सचिनची पहिली कार मारुती 800 होती.

अभिनेत्री सारा अली खानची पहिली कार पांढर्या रंगाची, ओल्डर जनरेशन Honda CR-V होती. ती 2.4-लिटर पेट्रोल इंजिनसह आली होती.

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याची पहिली कार सफारी होती. विराटला तेव्हा मोठ्या गाड्यांची फार हौस होती. तेव्हा त्याने 2008 साली त्याची पहिली गाडी घेतली होती.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या लक्झरी कारसाठी ओळखला जातो. त्याची पहिली कार फियाट पद्मिनी होती. ती 1964 ते 2001 दरम्यान भारतात तयार होत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.