JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ‘कासवा’सारख खेळत Hardik Pandyaचे षटकारांचे शतक पूर्ण, दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड

‘कासवा’सारख खेळत Hardik Pandyaचे षटकारांचे शतक पूर्ण, दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स(SRH vs GT IPL Match) यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेलेला सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अर्धशतक केले. यासोबत त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला.

जाहिरात

hardik pandya

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (SRH vs GT IPL Match) यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेलेला सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अर्धशतक केले. यासोबत त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. हार्दिकने हे रेकॉर्ड करताना युवराज आणि पठाण याना मागे टाकले आहे. सामन्यादरम्यान हार्दिकने एक शानदार विक्रमही आपल्या नावावर केला आहे. अर्धशतक करताना हार्दिकच्या बॅटमधून एक शानदार षटकार (Hardik Pandya 100 Six In IPL) निघाले. हा षटकार त्याच्यासाठी विक्रमी ठरला आहे. त्याने या षटकारासह त्याचे आयपीएलमधील 100 षटकार पूर्ण केले आहेत. तसेच तो सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 100 षटकार ठोकणारा पहिलाच भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमधील 1000 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याने एकूण 1046 चेंडूंचा सामना केला आहे. मॅचदरम्यान हार्दिकच्या हेल्मेटवर आदळला बॉल, घाबरलेल्या नताशाची Reaction होतेय Viral हे रेकॉर्ड करताना त्याने ऋषभ पंत, युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांचे विक्रम मोडीत काढले. पंतने 1224 चेंडूत 100 षटकार, युसूफने 1313 चेंडूत आणि युवराजने 1336 चेंडूत 100 षटकार पूर्ण केले होते. हार्दिकपूर्वी आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल यांनी सर्वात कमी चेंडू खेळताना हा पराक्रम केला होता. रसेलने केवळ 657 चेंडूंचा सामना करताना षटकारांचे हे खास शतक केले होते. तर गेलने यासाठी 943 चेंडू खेळले होते. संघ अडचणीत असताना हार्दिक पांड्याने हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. आयपीएलमधील 17 डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने 42 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावांची नाबाद खेळी केली. भात्यातील फटकेबाजी आणि गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या