सुंदर पिचाईंनी दिलं सणसणीत उत्तर
मुंबई, 24 ऑक्टोबर: ICC T20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बघितला नाही असा भारतीय शोधून सापडणार नाही. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात हा सामना बघितला गेला. हा सामना जिंकल्यानंतर जगभरातून फॅन्स टीम इंडिया आणि विराट कोहलीचंकौतुक करू लागले. अगदी प्राईम मिनिस्टर मोदींपासून ते गूगल कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनीही ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलं. अशाच सुंदर पिचाई यांच्या ट्विटखाली एका पाकिस्तानी फॅननं त्यांना डिवचलं. त्यावर सुंदर पिचाईंनी आपलं प्रेझेन्स ऑफ माईंड वापरत त्याला चांगलंच सणसणीत उत्तर दिल आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी ट्विटरवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. रविवारी T20 विश्वचषकात पाकिस्तानवर भारताचा चित्तथरारक विजय पाहून मी हा सण साजरा केल्याचं पिचाई यांनी सांगितलं. मात्र त्यांचं हे ट्विट आधीच घरचे टीव्ही फोडलेल्या आणि वैतागलेल्या पाकिस्तान फॅन्सया रुचलं नाही. त्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तान फॅननं त्यांच्या ट्विटखाली कमेंट केली.
“दिवाळीच्या शुभेच्छा! आशा आहे की उत्सव साजरा करणार्या प्रत्येकाचा तुमच्या मित्र आणि कुटुंबासह चांगला वेळ जाईल. मी आज पुन्हा शेवटची तीन ओव्हर्स पाहून आनंद साजरा केला, किती खेळ आणि कामगिरी #Diwali #TeamIndia #T20WC2022,” सुंदर पिचाई यांनी केलं होतं. या ट्विटवर कमेंट करताना “तुम्ही सुरुवातीचे तीन ओव्हर्सही बघायला हवे होते” असं ट्विट एका पाकिस्तानी फॅननं केलं.
मात्र यावर भन्नाट उत्तरासह सुंदर पिचाई त्या वापरकर्त्याला ट्रोल करताना म्हणाले “तेही केलं, भुवी आणि अर्शदीपची काय जादू आहे. त्यांनी अप्रतिम बॉलिंग केली”, पिचाई सामन्याच्या पहिल्या तीन षटकांचा संदर्भ देत होते जेव्हा अर्शदीपच्या ज्वलंत स्पेलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि जबरदस्त धावा करणारा मोहम्मद रिझवान पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या त्यांच्या उत्तरामुळे पात्र संपूर्ण जगात एकच चर्चा झाली. पाकिस्तानी फॅनला चूप बसवण्यात भारतीयांचा हात कोणी पकडू शकत नाही हे थेट Google CEO यांनी दाखवून दिलं. अखेर त्यांचंही हृदय एका भारतीयाचंच आहे.
झालं मग काय सोशल मीडियावर त्यांच्या या भन्नाट उत्तराची चर्चा सुरु झाली. त्यांच्या या उत्तरावर मिम बनण्यास सुरुवात झाली. अगदी काही यूजर्सनी त्यांच्या या उत्तराला सर्जिकल स्ट्राईकची उपमा दिली. तर कोणी बोहोत हार्ड म्हणत त्यांचं कौतुक केलं. पाकिस्तानी फॅन्स मात्र या सगळ्यात फुटलेल्या टीव्हीकडे बघत हे भन्नाट मिम्स वाचण्यात मग्न असतील.