JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराट अनुष्कानंतर आता MS Dhoni ने देखील प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video

विराट अनुष्कानंतर आता MS Dhoni ने देखील प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video

महेंद्रसिंह धोनीने झारखंड येथील प्रसिद्ध मंदिराला भेट दिली. इंस्टाग्रामवर क्रिकेट संबंधित फॅन पेजवर एमएस धोनीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी : सध्या भारतीय क्रिकेटपटू आध्यात्मिक दौरा करताना दिसत आहेत. मंगळवारी सकाळीच भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याने पत्नी अनुष्का शर्मा सोबत ऋषिकेश येथील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट दिली. आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने देखील झारखंड येथील प्रसिद्ध मंदिराला भेट दिली आहे. या भेटीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे ही वाचा  : ऑस्ट्रेलिया सीरिजआधी विराट-अनुष्का पोहोचले ‘बाबां’च्या चरणी, पाहा PHOTO इंस्टाग्रामवर क्रिकेट संबंधित फॅन पेजवर एमएस धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात धोनी त्याच्या काही जवळच्या मित्रांसोबत झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरात दर्शन घेत असताना दिसत आहे. मंदिरात आलेल्या धोनीने यावेळी इतर भाविकांसह गर्दीत उभे राहून दर्शन घेतले.

संबंधित बातम्या

काही दिवसांपूर्वी रांची येथे झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिकेतील पहिला सामना पाहण्यासाठी धोनी पत्नी साक्षी सोबत आला होता. यावेळी धोनीने भारतीय संघाची भेट घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या