जसप्रीत बुमरा टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर
मुंबई, 03 ऑक्टोबर: भारतीय संघ लवकरच टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पण मिशन वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराबाबत बीसीसीआयनं नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे. बुमरा दुखापतीमुळे वर्ल्ड कप खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. त्यामुळे रोहित शर्मा अँड कंपनीला बुमराशिवाय आगामी वर्ल्ड कप खेळावा लागणार आहे. रवींद्र जाडेजापाठोपाठ टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. बुमराला दुखापतीचा फटका बीसीसीईयं आज जाहीर केलेल्या अधिकृत माहितीत म्हटलंय… ‘वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातून जसप्रीत बुमराला वगळण्यात आलं आहे. वैद्यकीय टीम आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही त्याला मुकावं लागलं होतं. लवकरच बुमराऐवजी टी20 संघात कुणाला घेतलं जाईल याची घोषणा करु.’
एनसीएत सुरु होते बुमरावर उपचार तिरुअनंतपूरम टी20 नंतर बुमरा थेट बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत दाखल झाला. तिथे बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या त्याच्यावर लक्ष ठेऊन होती. याचदरम्यान टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी बुमराबाबत सकारात्मक विधान केलं होतं. पण दुर्दैवानं बुमराला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे बुमरा टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार ही शक्यता आता संपुष्टात आली आहे.
हेही वाचा - Lokesh Rahul: महागडी घड्याळं, गाड्या… अशी आहे लोकेश राहुलची लग्झरियस लाईफस्टाईल शमी, सिराज की चहर? दरम्यान आता टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात एक जागा खाली आहे. त्या जागेवर कोणत्या वेगवान गोलंदाजाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. बीसीसीआयनं बुमराबाबत अपडेट देताना हे नाव लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. पण त्यामध्ये मोहम्मद शमी, दीपक चहर आणि सिराज यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते.
टीम इंडियानं वर्ल्ड कपसाठी संघनिवड करताना चार खेळाडूंना स्टँड बायमध्ये ठेवलं होतं. मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर या चौघांचा स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्यापैकी बुमराची जागा घेतील असे दोन वेगवान गोलंदाज म्हणजे शमी आणि दीपक चहर. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुमराच्या जागी सिराजला संधी दिली होती. त्यामुळे या तिघांपैकी अंतिम 15 मध्ये कुणाला संधी मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.