JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / फिफा वर्ल्ड कप महासंग्राम, अंतिम सामना Jio Cinema अ‍ॅपवर फ्री पाहता येणार

फिफा वर्ल्ड कप महासंग्राम, अंतिम सामना Jio Cinema अ‍ॅपवर फ्री पाहता येणार

फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून इतिहास घडवण्याच्या इराद्याने फ्रान्स मैदानात उतरेल तर दुसरीकडे मेस्सी अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप जिंकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपच्या महासंग्रामातील अंतिम सामना आज होणार आहे. गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून इतिहास घडवण्याच्या इराद्याने फ्रान्स मैदानात उतरेल तर दुसरीकडे मेस्सी अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप जिंकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होईल अशी चाहत्यांना आशा आहे. अर्जेंटिनाने सेमीफायनलमध्ये गत उपविजेत्या क्रोएशियाला 3-0 ने हरवून अंतिम फेरीत धडक मारली. तर फ्रान्सने मोराक्कोला 2-0 ने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे. वर्ल्ड कपमध्ये मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यात गोल्डन बूटसाठी शर्यत दिसून येत आहे. सध्या फ्रान्सचा कर्णधार एम्बाप्पे यात आघाडीवर असून त्याने सहा सामन्यात सहा गोल केले आहेत. तर मेस्सीने सहा सामन्यात पाच गोल केले आहेत. हेही वाचा :  जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था FIFAची कमाई होते कशी? फ्रान्स जिंकणार की फायनल आधीच निवृत्तीची घोषणा केलेल्या मेस्सी वर्ल्ड कप उंचावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना दोहा लुसैल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. लुसैल स्टेडियम हे कतारमधील सर्वात मोठं मैदान आहे. या मैदानावर एका वेळी जवळपास 89 हजार प्रेक्षक बसू शकतात. हेही वाचा :  लिओनेल मेस्सी ते किलियन एमबाप्पे.. हे 6 खेळाडू स्वबळावर जिंकू शकतात फायनल फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सुरू होणार आहे. हा सामना भारतात स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवर पाहता येईल. तर Jio Cinema अॅपवर अंतिम सामना फ्रीमध्ये पाहता येणार आहे. कतार 2022 हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात जास्त पाहिला गेलेला FIFA वर्ल्ड कप ठरला आहे. JioCinemaवर FIFA वर्ल्ड कप कतार 2022 च्या प्रेक्षकांची संख्या 100 दशलक्ष ओलांडण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या