जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था FIFAची कमाई होते कशी?

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था FIFAची कमाई होते कशी?

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था FIFAची कमाई होते कशी?

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असणाऱ्या फिफाकडून वर्ल्ड कपमध्ये इतर खेळांच्या तुलनेत मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : फिफा ही जगातील सर्वात श्रीमंत अशी क्रीडा संस्था आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला 347 कोटी रुपये दिले जाणात आहेत. तर उपविजेत्याला जवळपास 248 कोटी रुपये बक्षीस मिळेल. एवढंच नव्हे तर तिसऱ्या स्थानावरील संघाला 223 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला 206 कोटी रुपये मिळणार आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असणाऱ्या फिफाकडून वर्ल्ड कपमध्ये इतर खेळांच्या तुलनेत मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते. फीफा ही एक अशी संस्था आहे ज्यांचा उद्देश केवळ खेळाचा विस्तार करणं आहे. फिफाला चार मार्गाने पैसे मिळतात. टेलिव्हिजनचे अधिकार, मार्केटिंगचे अधिकार, लायसन्स आणि तिकिट विक्री यातून फिफाची मोठी कमाई होते. अब्जावधी रुपये फिफाला यामधून मिळतात. हे पैसे फिफा वेगवेगळ्या देशांना आणि संघांना वाटते. जगभरात फुटबॉल खेळ वाढवण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आणि त्यासाठी पैसे दिले जातात. हेही वाचा :  लिओनेल मेस्सी ते किलियन एमबाप्पे.. हे 6 खेळाडू स्वबळावर जिंकू शकतात फायनल फिफाला सर्वाधिक पैसे हे ब्रॉडकास्टिंग हक्क विक्रीतून मिळतात. यासाठी लिलाव करण्यात येतो. फुटबॉल जगभरात लोकप्रिय असून कोट्यवधी चाहते फुटबॉलचे सामने पाहतात. यामुळे फिफाच्या टीव्ही हक्कासाठी अनेक कंपन्या बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या फिफाच्या सामन्यांचे प्रसारण करण्याचे हक्कम मिळतात. भारतात यंदा फिफा वर्ल्ड कपच्या प्रसारणाचे हक्क स्पोर्ट्स 18 ग्रुपकडे आहेत. आता टीव्हीच्या डीजीटल प्रसारणाच्या हक्कातूनही मोठी कमाई होते. फिफा वर्ल्ड कपच्या प्रायोजकापासून इतर अनेक स्पॉन्सर असतात जे सामन्यावेळी आपले नाव आणि लोगो दाखवला जावा यासाठी पैसे मोजतात. फिफा वर्ल्ड कप 2022  च्या मार्केटिंग हक्कातूनही फिफाला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. फिफा वर्ल्ड कप ब्रँड लायन्सिंग आणि रॉयल्टीच्या माध्यमातून पैसे कमावते. तसंच तिकिट विक्रीच्या माध्यमातून फिफाला पैसे मिळतात. फिफा वर्ल्ड कपसाठी तिकिटांची किंमत ७० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असते. हेही वाचा : एका बेटावर आहे मेस्सीचं आलिशान घर, किंमत वाचून थक्क व्हाल

 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला बक्षीस फिफा वर्ल्ड कपमध्ये 32 संघ सहभागी असतात. या सर्व संघांना बक्षीस म्हणून काही ना काही रक्कम मिळते. फिफा वर्ल्ड कपमध्ये 3३ हजार 500 कोटी रुपये बक्षीस म्हणून संघांना दिले जातील. सुपर 16 फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही मोठी रक्कम मिळते. 9 ते 16 व्या क्रमांकावरील संघांना 106 कोटी तर 17 ते 32 व्या क्रमांकावरील संघांना 72 कोटी रुपये मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात