अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी त्याच्या खेळामुळे फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडुंच्या यादीत त्याचे नाव आघाडीवर आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मुंबई, 17 डिसेंबर : सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. फुटबॉल चाहते सध्या अर्जेंटिना टीमचा कॅप्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जादुई खेळाचा आनंद घेत आहेत. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाची टीम फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. 35 वर्षांच्या मेस्सीने ही आपली शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा असेल, असं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत आपल्या टीमने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावावं, अशी त्याची इच्छा आहे. मेस्सीच्या सातत्यपूर्ण खेळामुळे जगभर त्याच्या नावाचा गजर होत आहे. यादरम्यान, मेस्सीच्या घराबाबत एक माहिती व्हायरल होत आहे या वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बूटचा प्रबळ दावेदार असलेला मेस्सी मैदानाबाहेर अतिशय लक्झरिअस आयुष्य जगतो. एका बातमीनुसार, मेस्सीकडे जगभरात 23 मिलियन पौंड (सुमारे 234 कोटी रुपये) किमतीची आलिशान घरं आहेत. यातलं एक घर स्पेनमधल्या ‘गावा’ या शहरात आहे. हेही वाचा : फायनलआधी मेस्सीच्या दुखापतीने वाढवली अर्जेंटिनाचा चिंता, सरावाला न आल्याने चर्चा
2018मध्ये झालेल्या कॉन्फरन्समध्ये एका एअरलाइनच्या चेअरमनने मेस्सीच्या गावा इथल्या घराविषयी एक रंजक गोष्ट उघड केली होती. मेस्सीच्या घरावरून विमान उडू शकत नाही, असं अध्यक्षांनी सांगितलं होतं. असं करण्यास बंदी आहे.पुढे त्यांनी असंही सांगितलं होतं, की या बंदीचा मेस्सीच्या तिथे राहण्याशी काहीही संबंध नाही. मेस्सीचं घर हे पर्यावरण प्रतिबंधक क्षेत्रात आहे. या परिसरातलं हवाई क्षेत्रही प्रतिबंधित आहे. त्यामुळे कोणतीही विमानं या परिसरात प्रवेश करू शकत नाहीत.
‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लिओनेल मेस्सीची जगभरात चार ठिकाणी आलिशान घरं आहेत. सर्वांत महागडं घर स्पेनजवळच्या इबिझा बेटावर आहे. त्याची किंमत 9.5 दशलक्ष पौंड (सुमारे 97 कोटी रुपये) आहे. मेस्सी फक्त सुट्टीसाठी या घराचा वापर करतो. हे घर अद्याप राहण्यास तयार नाही, असं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. हेही वाचा : पुरुष संघासोबत खेळत असल्यासारखं वाटतं, ऑस्ट्रेलियन महिला टीमबद्दल शेफालीचं वक्तव्य बार्सिलोनामध्येदेखील मेस्सीचा एक बंगला आहे. या बंगल्याची किंमत 5.5 मिलियन पौंड (सुमारे 56 कोटी रुपये) इतकी आहे. हे घर कॅम्प नाऊ स्टेडियमपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. या घरात एक लहान फुटबॉल कोर्ट, एक स्विमिंग पूल, एक इनडोअर जिम आणि एक खेळाचं मैदानदेखील आहे. दरम्यान, अर्जेंटिनाची टीम वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली असून फ्रान्सविरुद्ध त्यांची मॅच होणार आहे.