JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Eng vs Pak: बटलरची ब्रिटीश आर्मी टी20 चॅम्पियन, बाबरसेना ढेर; 30 वर्षांपूर्वीचा 'तो' बदला पूर्ण

Eng vs Pak: बटलरची ब्रिटीश आर्मी टी20 चॅम्पियन, बाबरसेना ढेर; 30 वर्षांपूर्वीचा 'तो' बदला पूर्ण

Eng vs Pak: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं पाकिस्तानला हरवून इंग्लंड दुसऱ्यांदा टी20 चॅम्पियन ठरला आहे. शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडनं अखेर बाजी मारली.

जाहिरात

बेन स्टोक्सनं इंग्लंडला पुन्हा बनवलं वर्ल्ड चॅम्पियन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 13 नोव्हेंबर: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीनं फायनलचा मुकाबला रंगला. पण अखेर बेन स्टोक्सच्या आणखी एका झुंजार खेळीनं इंग्लंडला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. पाकिस्ताननं दिलेलं अवघं 138 धावांचं लक्ष्य इंग्लंडनं 5 विकेट्सच्या मोबदल्यात आरामात पार केलं. या विजयासह इंग्लंड टी20 वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली. पण त्याचबरोबर 30 वर्षांपूर्वी याच ग्राऊंडवर पाकिस्ताननं वन वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेतला. त्याचबरोबर वन डे आणि टी20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड ही पहिलीच टीम ठरली. 2019 साली इंग्लंडनं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यात आता जोस बटलरच्या टीमनं आणखी एक वर्ल्ड कप ट्रॉफी इंग्लंडला जिंकून दिलं. आफ्रिदीला मोक्याच्या क्षणी दुखापत इंग्लंडला विजयासाठी 30 बॉल्समध्ये 41 रन्स हवे असताना 16वी ओव्हर टाकण्यासाठी शाहीन आफ्रीदी बॉलिंगला आला. पण या ओव्हरमध्ये फक्त एक बॉल टाकून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅचमध्ये हाच टर्निंग पॉईंट ठरला. त्याच ओव्हरमध्ये उरलेले 5 बॉल टाकण्यासाठी आलेल्या इफ्तिकारच्या बॉलिंगवर इंग्लंडनं 13 धावा वसूल केल्या आणि मॅच इंग्लंडच्या पारड्यात गेली. पुढच्या ओव्हरमध्ये स्टोक्स आणि मोईन अलीनं आणखी 16 धावा फटकावल्या आणि विजय निश्चित केला.

स्टोक्सची पुन्हा झुंजार खेळी 2019 साली बेन स्टोक्सनं एकाकी झुंज देत इंग्लंडला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवलं होतं. तोच स्टोक्स पुन्हा एकदा इंग्लिश संघाच्या मदतीला धावून आला. स्टोक्सनं नाबाद खेळी केली त्याचबरोबर पाचव्या विकेटसाठी मोईन अलीसोबत केलेली 47 धावांची खेळी निर्णायक ठरली.

फायनलमध्ये पाकिस्तान ढेर दरम्यान फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजांना फार मोठी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 137 धावाच करता आल्या. या महत्वाच्या लढतीत शान मसूदनं सर्वाधिक 38 धावा केल्या. तर बाबर आझमनं 32 धावांची खेळी केली. पण सॅम करन (3), जॉर्डन, आदिल रशिद (2) आणि बेन स्टोक्स (1) यांच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानला मोठी मजल मारता आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या