सॅम करन
मेलबर्न, 13 नोव्हेंबर: मेलबर्नमध्ये आठव्या टी20 वर्ल्ड कपची मेगा फायनल सुरु आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि रिझवान ही जोडी मैदानात उतरली. पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला संधी दरम्यान या सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडनं एक मोठी संधी गमावली. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं ही पहिली ओव्हर टाकली. पण या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिझवानची विकेट घेण्याची एक मोठी संधी इंग्लंडसमोर होती. रिझवाननं मिड ऑफच्या दिशेनं फटका खेळला पण बाबर आझमनं एका धावेची मागणी केली. ही धाव घेताना रिझवान नॉन स्ट्रायकर एन्डला आऊट होण्याच्या स्थितीत होता. पण मिड ऑफला उभ्या असलेल्या जॉर्डनचा थ्रो थेट स्टम्प्सला लागला नाही त्यामुळे रिझवान थोडक्यात बचावला.
सॅम करननं धाडलं माघारी दरम्यान इंग्लंडसाठी रिझवानची विकेट महत्वाची ठरली असती. कारण रिझवान हा पाकिस्तानचा सर्वात धोकादायक बॅट्समन आहे. त्यानं सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे इंग्लंडनं जर पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडलं असतं तर पाकिस्तानवर मोठा दबाव आला असता. पण जॉर्डनची ती चूक सॅम करननं सुधारली. त्यानं आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये रिझवानची बोल्ड उडवली आणि इंग्लंडच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. रिझवान 15 धावा काढून बाद झाला.