JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: बांगलादेश-श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’, कुणाला मिळणार सुपर फोरचं तिकीट?

Asia Cup 2022: बांगलादेश-श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’, कुणाला मिळणार सुपर फोरचं तिकीट?

Asia Cup 2022: अफगाणिस्ताननं आधी श्रीलंका आणि मग बांगलादेशला हरवून सुपर फोर फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आज श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये जो जिंकेल त्याला सुपर फोर फेरीत स्थान मिळेल.

जाहिरात

बांगलादेशचा आज श्रीलंकेशी सामना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 1 सप्टेंबर – आशिया चषकात अ गटातील शेवटचा साखळी सामना आज दुबईच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यात श्रीलंकेसमोर आव्हान असेल ते बांगलादेशचं. पण दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असाच असणार आहे. कारण अ गटातील आपापल्या सलामीच्या लढतीत या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल त्याच्यासाठी सुपर फोर फेरीची दारं खुली होणार आहेत. अ गटात अफगाणिस्तान अव्वल अ गटात श्रीलंका आणि बांगलादेशसह अफगाणिस्तानचा समावेश आहे. पण अफगाणिस्ताननं आधी श्रीलंका आणि मग बांगलादेशला हरवून सुपर फोर फेरीत प्रवेश केला आहे. आशिया चषकाची सलामीची लढत अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघात रंगली होती. तेव्हा अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा तब्बल आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्यानंतर बांगलादेशला सात  विकेट्सनी हरवून अफगाणिस्ताननं अ गटात अव्वल स्थानावर कब्जा केला. त्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये जो जिंकेल त्याला सुपर फोर फेरीत स्थान मिळेल. श्रीलंकेसाठी प्रतिष्ठेची लढत श्रीलंकेनं आजवर पाच वेळा आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. 2014 साली श्रीलंकेनं शेवटचा आशिया चषक जिंकला होता. पण त्यानंतर 2016 आणि 2018 साली लंकन खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. यंदाही श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संबंधित बातम्या

बांगलादेश सुपर फोरसाठी उत्सुक टी20 तील अव्वल अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचा बांगलादेश संघ 2018 साली आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता. त्यावेळी भारताकडून झालेल्या पराभवामुळे बांगलादेशला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यंदा नव्या दमानं बांगलादेश स्पर्धेत उतरला. पण अफगाणिस्ताननं बांगला टायगर्सचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे श्रीलंकेला हरवून स्पर्धेत जोरदार कमबॅक करण्याची एकमेव संधी आता बांगलादेशकडे आहे. हेही वाचा -  T20 WC 2022: टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, सिंगापूरचा ऑलराऊंडर खेळाडू कांगारुंच्या टीममध्ये सामना - आशिया चषक अ गट, श्रीलंका वि. बांगलादेश वेळ – संध्याकाळी, 7.30 वा. ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस आणि डिस्ने हॉटस्टार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या