मुंबई, 1 सप्टेंबर**:** ऑस्ट्रेलियानं मायदेशात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यंदा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीय संघाची कमान अरॉन फिंचकडे सोपवली आहे. तर पॅट कमिन्सकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सिंगापूरचा स्टार अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिडला आपल्या संघात स्थान देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. टीम डेव्हिडकडे ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. विश्वविजेत्या संघात केवळ एक बदल अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्या संघातील केवळ एका सदस्याला वगळून टीम डेव्हिडचा संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मिचेल स्वॅपसन ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. पण यंदा त्याला वगळण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, शेन वॉटसन आणि ब्रॅड हॉग या माजी खेळाडूंनी यापूर्वीच 26 वर्षीय डेव्हिडचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्याची मागणी केली होती. पॉन्टिंगनं तर टीम डेव्हिडची तुलना चक्क ऑस्ट्रेलियाचा दिवंगत अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंडशी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग डेव्हिडला सायमंड्सइतकाच धोकादायक मानतो.
World Cup squad assembled!
— Cricket Australia (@CricketAus) August 31, 2022
Here's the 15 who will represent our national men's team at the upcoming T20 World Cup and tour of India 🇦🇺 pic.twitter.com/DUgqUGWuyV
हेही वाचा - Asia Cup 2022: भारत-पाक सामन्यातील खेळाडूंना आयसीसीकडून मोठा दंड, पाहा नेमकं काय घडलं? आयपीएलमध्ये डेव्हिड मुंबई संघात टीम डेव्हिडने 2020 पर्यंत सिंगापूरसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र तो आयपीएलसह अनेक व्यावसायिक लीगमध्ये आपली दमदार कामगिरी बजावत आहे. गेले दोन सीझन डेव्हिड आयपीएलमध्ये खेळत आहे. 2021 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. तर यावर्षी त्याला मुंबई इंडियन्सने 8.25 कोटीची बोली लावून विकत घेतलं होतं.