माराडोनाचा ऐतिहासिक गोल
मुंबई, 17 नोव्हेंबर: कतारमध्ये येत्या रविवारपासून जागतिक फुटबॉलमधल्या सर्वात मोठ्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. आखाती देशात पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातंय. त्यामुळे जगातले दिग्गज खेळाडू सध्या कतारमध्ये दाखल झाले आहेत. जगातल्या 32 संघांमध्ये वर्ल्ड कपसाठीचा हा महासंग्राम रंगणार आहे. याच दरम्यान फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासातील एका महत्वाच्या गोष्टी सध्या चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे 1986 च्या वर्ल्ड कपमधील ‘हँड ऑफ गॉड’वाला तो फुटबॉल. वर्ल्ड कपमधला ऐतिहासिक वारसा समजल्या जाणाऱ्या याच फुटबॉलचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. त्या लिलावात या बॉलला कोट्यवधींची किंमत मिळली आहे. ‘हँड ऑफ गॉड’ चा किस्सा अर्जेन्टिनानं 1986 साली दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. याच वर्ल्ड कपमधली एक मॅच प्रचंड गाजली. ती मॅच होती इंग्लंड आणि अर्जेन्टिनामधली क्वार्टर फायनल. या मॅचमध्ये माराडोनानं दोन गोल करुन अर्जेन्टिनाला जिंकून दिलं. पण या दोनपैकी एक गोल ‘गोल ऑफ द सेन्च्युरी’ म्हणून नोंद झाला. इंग्लंडविरुद्धच्या त्या मॅचमध्ये 51 व्या मिनिटाला माराडोनानं पहिला गोल करुन अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली. पण त्याच्या चौथ्याच मिनिटाला माराडोनानं दुसरा गोल डागला. या गोलनं अर्जेन्टिनाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून दिलं. पण सामन्यानंतर टेलिव्हिजन कॅमेऱ्यामध्ये माराडोनाचा हा गोल वैध नसल्याचं स्पष्ट दिसून आलं. कारण हा गोल करताना माराडोनानं हाताचा वापर केल्याचं स्पष्ट दिसत होतं. अर्जेन्टिनानं सामना 2-1 असा जिंकला पण तो गोल ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून प्रसिद्ध झाला.
‘त्या’ फुबॉलला सोन्याचा भाव दरम्यान याच सामन्यातला त्या फुटबॉलचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्या लिलावात हा फुटबॉल कोट्यवधींमध्ये विकला गेला. लंडनमध्ये पार पडलेल्या या लिलावात ऐतिहासिक महत्व असलेल्या या फुटबॉलला जवळपास 19 कोटींची किंमत मिळाली. सहा महिन्यांपूर्वी माराडोनाच्या जर्सीलाही सुमारे 75 कोटींची बोली लागली होती.
हेही वाचा - IPL 2023: रिटेन खेळाडूंचं ‘रिटर्न गिफ्ट’, फ्रँचायझी झाले खुश! पाहा काय घडलं? अर्जेन्टिना तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणार? लायनल मेसीच्या नेतृत्वात यंदा अर्जेन्टिनाचा संघ वर्ल्ड कपमध्ये उतरला आहे. अर्जेन्टिनाच्या ग्रुपमध्ये सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड असे संघ आहेत. 1996 नंतर पुन्हा अर्जेन्टिनाला फिफा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. 2014 साली अर्जेन्टिनानं फायनल गाठली होती. पण ब्राझीलनं त्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यामुळे आता सध्याच्या जमान्यातला दिग्गज फुटबॉलर लायनल मेसीसमोर अर्जेन्टिनाला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून देण्याची अखेरची संधी असेल. 35 वर्षांच्या मेसीनं याआधीच हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असल्याचं जाहीर केलं होतं.